BMC Recruitment 2025 :बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत विविध पदांसाठी भरतीसाठी जाहिरात घेण्यात आली आहे. ही भरती लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, शीव (Sion) येथे ही भरती घेतली जाणार आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांना ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करावयाच लागेल. १ August२०२५ पर्यंत अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे.
भरली जाणारी पदे?
ही भरती क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ऑडिओलॉजीसह स्पीच थेरपिस्ट,स्पीच थेरपीस्ट-सी ऑडिओलॉजिस्ट, ब्लड बँक टेक्निशियन, ई.सी.जी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन या पदांसाठी भरती केली जाणार आहे. याचसोबत नेत्रतज्ज्ञ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता : BMC Recruitment
- एकूण १९ पदांसाठी ही भरती घेतली जाणार आहे. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट पदासाठी संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असाली पाहिजे.
- ऑडिओलॉजी सह स्पीच थेरपिस्ट पदाकरिता ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.
- ई.सी.जी टेक्निशियन पदासाठी विज्ञान शाखेतून १२वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
- कार्डिओ टेक्नोलॉजीमध्ये बीएस.सी केलेले असावे.
- न्युरोलॉजी टेक्निशियन पदावासाठी बी.पी.एम,टीअंतर्गत पदवी प्राप्त केलेली असावी.
- लॅब टेक्निशियन पदासाठी बी.एससी पॅरामेडिकल टेक्नोलॉजीसह इंटर्नशिप केलेली असावी.
Offline पध्दतीने अर्ज कुठे पाठवायचे?
हा अर्ज एल.टी.एमएस. रुग्णालयाचा आवक विभाग येथे पाठवायाच आहे.
मासिक वित्त किती दिले जाणार ?
या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला २०,००० ते ५०,००० रुपये पर्यंत पगार दिला जाणार आहे.