शाळेत चायवाला म्हणून हिणवलं.. वाचा IAS हिमांशू गुप्ता यांची थक्क करणारी यशोगाथा.. 

Spread the love

शाळेत हिणवलेला विद्यार्थी झाला IAS स्वप्न बघण्यात आणि ते साक्षात पूर्ण करणे हे सोपे नाही. परंतु जिद्द आणि चिकाटीने ते पूर्ण करता येतात. असेच जिद्दीच्या जोरावर आपल्याला जे हवे होते ते मिळवले आणि शेवटी ते साध्य करूनच दाखवले.आम्ही बोलत आहोत IAS अधिकारी हिमांशू गुप्ता, जे मूळचे उत्तराखंडमधील सितारगंज जिल्ह्यातील आहेत. IAS हिमांशू गुप्ता युवा वर्गासाठी एक प्रेरणा आहेत. शैक्षणिक सुविधांच्या कमतरतेमुळे अनेकांना परीक्षेची तयारीही करता येत नाही. पण हिमांशु यांनी गरिबी आणि अनेक अडचणींचा सामना करून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत.

उत्तराखंडमध्ये जन्मलेला हिमांशू गुप्ता आपल्या वडिलांसोबत चहाच्या गाडीवर चहा विकायचे. आपल्या मुलाला चांगल्या सुविधा देऊ शकतील इतकी त्यांच्या वडिलांची कमाई नव्हती. दरम्यानच्या काळात हिमांशूने जेव्हा निरक्षर लोकांना हाताच्या बोटावर आकडेमोड करताना पाहिले तेव्हा अशा व्यक्तींचे आयुष्य बदलण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

अभ्यासासाठी रोजचा 70 किलोमीटरचा प्रवास
“शिक्षणासाठी मी दररोज शाळेत जायचो आणि शाळेतून घरी आल्यावर वडिलांसोबत चहाच्या टपरीवर काम करायचो. माझी शाळा घरापासून 35 कि. मी. दूर होती. त्यामुळे शाळेत जाताना आणि येताना एकूण 70 कि. मी. चा प्रवास करावा लागत असे;” असे हिमांशू यांनी (UPSC Success Story) एका मुलाखतीदरम्यान सांगितले.

“मी शाळेत जाण्यापूर्वी चहाच्या टपरीवर वडिलांना कामात मदत करत असे. आम्ही व्हॅनने शाळेत जायचो, त्यामुळे जेव्हा जेव्हा व्हॅन माझ्या चहाच्या टपरीजवळून जात असे तेव्हा मी लपून बसायचो. कारण शाळेतील मुलांनी एकदा मला पाहिलं. त्यानंतर सगळे माझी चेष्टा करू (UPSC Success Story) लागले. तेव्हा मला सगळे ‘चायवाला’ म्हणून चिडवत होते. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि वेळ मिळेल तेव्हा माझ्या वडिलांना कामात मदत केली. आमचे घर चालवण्यासाठी आम्ही दिवसाला 400 रुपये कमावयचो;” असेही हिमांशू यांनी सांगितले.
एकेकाळी आयएएस अधिकारी हिमांशू गुप्ता यांना इंग्रजी शिक्षणासाठी दररोज 70 कि. मी. चा प्रवास करावा लागत होता. शालेय शिक्षण पूर्ण (UPSC Success Story) केल्यानंतर हिमांशू यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि ट्यूशन घेऊन आणि ब्लॉग लिहून त्यांची फी भरली; असेही हिमांशू यांनी सांगितले.

कॉलेजचा टॉपर विद्यार्थी
त्यांनी पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आणि आपल्या बॅचमध्ये टॉप केले. हिमांशु यांच्याकडे परदेशात PHD करण्याचा पर्याय होता पण त्यांनी भारतात राहून सिव्हिल (UPSC Success Story) सर्व्हिसेसचा अभ्यास करणे पसंत केले. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी हिमांशू एका सरकारी कॉलेजमध्ये रिसर्च स्कॉलर म्हणून रुजू झाले. यामाध्यमातून त्यांना केवळ स्टायपेंड मिळण्यास मदत झाली नाही तर नागरी सेवेच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी शैक्षणिक वातावरण देखील मिळाले.

हिमांशू गुप्ता यांनी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी सलग तीनवेळा प्रयत्न केला. पहिल्याच प्रयत्नात ते सिव्हिल सर्व्हिसेससाठी पात्र ठरले पण त्यांची फक्त IRTS साठी निवड झाली. तरीही त्यांनी तयारी सुरू ठेवली आणि 2019 च्या यूपीएससी परीक्षेत ते IPS झाले. शेवटच्या (UPSC Success Story) प्रयत्नात ते UPSC सिव्हिल सर्व्हिसेससाठी हजर झाले आणि संपूर्ण भारतातून 304 रॅंक मिळवत त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत IAS अधिकारी म्हणून निवड झाली. हिमांशु मेहनत आणि ध्येयापासून विचलित न होण्याची वृत्ती सर्वांना प्रेरणा देणारी आहे. शाळेत हिणवलेला विद्यार्थी झाला IAS


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top