पोलीस भरती सराव टेस्ट = 13 | बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

Published on: 22/11/2025
mock test police bharti
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025

पोलीस भरती सराव टेस्ट = 13 | बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

आपण सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार मोफत सराव प्रश्नांचा Series सुरू केलेले आहे त्या Series मधील हा एक भाग आहे त्यामुळे तुमच्या जवळच्या मित्रांना आपली ह्या सिरीज बद्दल नक्की कळवा जेणेकरून त्यांना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये फायदा होईल. Path for SEO – mock test police bharti | mock test police bharti | mock test police bharti

🔖 बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️ 🔢 टेस्ट क्रमांक – 02 🔴 एकूण प्रश्न : 20 ✅Passing : 10 🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. TEST Solve Now
mock test police bharti

पोलीस भरती सराव टेस्ट = 13 | बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

🔖 बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

पुढे एक मुख्य विधान दिले असून त्यानंतर (a), (b). (c) आणि (d) अशी नामनिर्देशने असलेली विधाने दिली आहेत. 1 त्या विधानाल 2 रे विधान अंतर्निहीत असणारी आणि दोन्ही विधाने एकत्रितपणे मुख्य विधानाशी तर्कसंगत असतील अशी क्रमवार जोडी निवडा. जर तुमच्याकडे तिकिट असेल तरच तुम्ही नाटक पाहू शकता.
a) तुम्ही नाटक पाहिले.
b) तुमच्याकडे तिकिट होते.
c) तुम्ही नाटक पाहिले नाही.
d) तुमच्याकडे तिकिट नव्हते.
पर्यायी उत्तरे :

2 / 20

पुढे 5 विधाने आणि नंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जुळवले आहेत. त्यातून तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देशित करणारा पर्याय निवडा. युक्तिवाद यथार्थ ठरण्यासाठी जुळणीतील 3 रे विधान हे त्याआधीच्या 2 विधानांवर आधारित निष्कर्ष विधान असायला हवे.
a) काही वाहने पर्यावरणासाठी हानिकारक नाहीत.
b) वाहनांची वाहतूक कार्बन डायॉक्साईड व अन्य हरितगृह वायूंचा उत्सर्ग करते.c) कार्बन डायॉक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत.
d) काही वाहनांची वाहतूक कार्बन डायॉक्साईड व हरितगृह वायूंचा उत्सर्ग करत नाही.
e) वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे.
पर्यायी उत्तरे :

3 / 20

प्रोटिन्सचा उत्तम स्रोत असल्यामुळे माशांना वाढती मागणी आहे. यामुळे आज जगातील जवळपास 70% सागरी साठ्यात गैरवाजवी मासेमारी केली जाते तर काही ठिकाणी ते पूर्णपणे संपवले गेले आहेत. मानवी वापरासाठी मत्स्योत्पादन करण्यासाठी जलशेतीचे प्रमाण सातत्याने व्यापक होत आहे. पण यात मत्स्यशेतीशी संबंधित पाणी प्रदूषण आणि लागून असलेल्या नैसर्गिक माशांच्या समूहात आजारांचा प्रादुर्भाव पसरवणाऱ्या पर्यावरण जोखमीचेही व्यवस्थापन करणे गरजेचे ठरते. यासाठी जलशेती क्षेत्राने मत्स्य प्रजाती, विशेषतः कूपासारख्या भक्ष्यक माशांच्या परिणामकारक आणि पर्यावरणस्नेही पद्धती विकसित केली पाहिजे. सागरी वन्यपकडीचे मासे खायला घालून पोसलेल्या कूपासारखे मासे खाण्याचे धनवान लोकांना वेड असते आणि याचा सागरावर ताण येतो.पुढे दिलेल्या विधानांतून वरील परिच्छेदाचा सर्वात उचित निष्कर्ष निवडा.

4 / 20

उपलब्ध असलेल्या विदेतून, एका शहरातील रस्त्यांवरील विविध वर्गवारीच्या वाहनांच्या परिणामी झालेल्या प्रदूषणाचे प्रमाण पुढीलप्रमाणे उघड झाले आहे. खाजगी चार चाकी गाड्या सर्वात जास्त प्रदूषण करतात, त्याखालोखाल बस, ट्रक आणि शेवटी दोन चाकी वाहने प्रदूषण करतात. पुढील पर्यायांतून वरील विदेच्या आधारे काढता येणारा / रे निष्कर्ष निवडा.
a) शहरांच्या रस्त्यांवर धावणाऱ्या दुचाकी वाहनांची संख्या चारचाकी वाहनांच्या संख्येपेक्षा कमी आहे.
b) एका खाजगी वाहनामुळे होणारे प्रदूषण कोणत्याही एका बसमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा जास्त असेल. असेल.
पर्यायी उत्तरे :

5 / 20

योग्य निष्कर्ष निवडा :
विधान :
औरंगाबाद ते चेन्नई प्रवास हवाई मार्गाने जलद होतो.
निष्कर्ष :
a) औरंगाबाद आणि चेन्नई ही ठिकाणे हवाई मार्गाने जोडलेली आहे.
a) औरंगाबाद आणि चेन्नई ही ठिकाणे हवाई मार्गाने जोडलेली आहे.
b) औरंगाबाद ते चेन्नईसाठी दुसरा कोणताही दळण-वळणाचा मार्ग उपलब्ध नाही.
पर्यायी उत्तरे :

6 / 20

केवळ हेरॉइन आणि कोकेन यासारख्या बेकायदेशीर औषधांचा जागतिक आरोग्यावर भयानक परिणाम होतो आहे असे नाही. बनावट औषधे देखील तितकीच तीव्र घातक परिणाम करत आहेत. अनेकदा या बनावट औषधांत जीवघेणी रसायने असतात आणि जेव्हा उपचारांसाठी त्यांचा वापर केला जातो तेव्हा ती रुग्णाचा जीवही घेतात. अधिकृतरीत्या अनेक पर्यायी औषधोपचार उपलब्ध आहेत. त्यांतील घटक कृतिशील नसल्याने ती तशी निरुपद्रवी असतात पण जाहिरातींतून दावा केल्याप्रमाणे ती परिणामकारक व निरुपद्रवीही नसतात. बेकायदेशीर औषधांची समस्या हाताळण्यासाठी अनेक पावले उचलली जातात परंतु बनावट औषधांची समस्या गंभीर मानली जात नाही.. बनावट औषधांचा प्रश्न तातडीने तडीला नेण्यासाठी परिणामकारक तोडगा शोधण्याची गरज आहे.वरील परिच्छेदाचा प्रमुख निष्कर्ष उत्तम प्रकारे व्यक्त करणारा पर्याय निवडा.

7 / 20

जेव्हा व्यक्ती अन्य देशात जाते तेव्हा त्याने किंवा तिने अल्पावधीत भाषा आत्मसात करणे कठीण असले तरीही किमान त्या देशाची भाषा थोड्या प्रमाणात शिकायला हवी. देशाची भाषा थोड्या प्रमाणात आत्मसात झाली तरी ती तुम्हाला त्या देशासंबंधी व तेथील लोकांच्या चालीरीतीविषयी अधिक माहिती मिळवायला मदत करते. त्याचप्रमाणे एखाद्या गोष्टीकडे अंगुलीनिर्देश करून वा हातवारे करण्याऐवजी माहिती, पत्ता विचारणें, दुकानात किंवा विश्रांतीगृहात स्वतःला काय हवे ते मागवणे इत्यादी गोष्टी तुम्ही अधिक सोपेपणाने करू शकता हे निश्चितच कमी पेचात टाकणारे आहे असाही त्याचा अर्थ होतो. वरील युक्तिवादाचा प्रमुख निष्कर्ष ठरेल अशी सर्वात उचित अभिव्यक्ती पुढील पर्यायांतून निवडा.

8 / 20

2011 साली जपानमध्ये फुकुशिमा अणु ऊर्जा यंत्रणेत अपघात झाला होता. यामुळे या भागात किरणोत्सर्गी प्लुटोनियम विखुरला गेला आणि शासनाला जवळपास पाच लाख लोकांना त्यातून विस्थापित करावे लागले. किरणोत्सर्गाच्या संपर्कात आरोग्याला पोहोचणाऱ्या धोक्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी, या भागात पुन्हा परतायला लोकांवर बंदी घालण्यात आली. पण फुकुशिमासारख्याच चेनोंबिल येथे घडलेल्या तशाच परिस्थितीच्या अभ्यासाने, जरी व्यक्तींचे सरासरी आयुर्मान घटले तरी त्याला पूर्णपणे किरणोत्सर्गामुळे झालेला कर्करोग कारणीभूत नव्हता असे दाखवून दिले.. जन्मभराच्या निर्वासिततेमुळे आलेली खिश्रमनस्कता, दारूचे व्यसन आणि आत्महत्या ही पटलेल्या आयुर्मानाची प्रमुख कारणे होती. म्हणजेच कायमच्या निर्वासिततेमुळे झालेले मनोवैज्ञानिक परिणाम कदाचित किरणोत्सर्गाच्या शारीरिक परिणामांपेक्षा अधिक गंभीर होते. किरणोत्सर्गाच्या सुरक्षितता पातळीबद्दल वैज्ञानिकांत सहमती नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणून आता इच्छा असल्यास फुकुशिमा निर्वासितांना स्वतःच्या मूळ निवासात परतायची मोकळीक दिली पाहिजे.वरील युक्तिवादाचा सर्वात उत्तम प्रकारे प्रमुख निष्कर्ष व्यक्त करणारे पुढीलपैकी एक विधान निवडा.

9 / 20

त्याच्या 6 वीच्या वर्गाकडून प्रकाशित होणाऱ्या दैनिकाचे सदर लिहिण्यासाठी उमेदला यादृच्छिकरित्या निवडलेल्या कुटुंबांकडून कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या उपायांची माहिती गोळा करायची होती. त्याने 57 कुटुंबांना आवश्यक माहिती मिळवण्यासाठी खास रचलेली प्रश्नावली पूर्ण करण्याची विनंती करणारे पत्र पाठवले. प्रत्येक विनंतीसोबत त्याने त्यात स्वतःचा पत्ता लिहून तिकीट चिकटवलेला लिफाफाही ठेवला. या प्रत्येक तिकीटाची किंमत 6.6 रु. आहे. त्याला त्यातील 33 जणांकडून प्रतिसाद मिळाला तेव्हा तो खुश झाला.या खटपटीत उमेदला पोस्टाच्या तिकीटांसाठी किती खर्च आला याचा हिशेब करण्यासाठी वरीलपैकी गरज नसलेल्या माहितीची निवड करा.

10 / 20

सुरक्षा तज्ञ तसेच पूर्वी-आर्थिक गुन्हेगार असलेले कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तज्ञ लोकही आहेत. सर्व लोक, जे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तज्ञ आहेत अशांना एका संस्थेने सुरक्षा रचनाकारांच्या (SD) चमूत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे. वरील विधानांच्या आधारे करता येणारे पुढीलपैकी एक तर्कसंगत अनुमान निवडा.

11 / 20

ग्रंथालय असावे वा नसावे हे ठरवण्यासाठी निंबोली गावात जनमत घेण्यात आले. सर्व प्रौढांना मताधिकार होता. सर्वांनी एकतर ग्रंथालय असावे म्हणून किंवा नसावे म्हणून मतदान केले किंवा मतदान केले नाही. स्थानिक वातपित्रानुसार PARGAL 'मतदान केलेल्यांपैकी 80% नी ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले आणि गावच्या 80% प्रौढ मतदारांनी गावात ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले नाही'.ग्रंथालय असण्याविरोधात असलेली गावातील प्रौढ मतदारांची टक्केवारी निवडा.

12 / 20

हा विद्यार्थी परीक्षा अनुत्तीर्ण झाले' हा निष्कर्ष नेहमी । सत्य ठरवणारी दोन तथ्ये ओळखा.
लक्ष्ये:
a) 40 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले.
b) 10 विद्यार्थ्यांनी परीक्षा पूर्ण केली नाही म्हणून ते उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण झाले नाहीत,
c) अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या परीक्षा पूर्ण न करणाऱ्याांपेक्षा 5 : 1 ने जास्त आहे.
d) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अनुत्तीर्ण विद्याथ्र्यांपेक्षा 4: 1 ने जास्त आहे,
पर्यायी उत्तरे :

13 / 20

पुढील माहिती आणि त्यावर आधारित कृतिक्रम दिले आहेत. उचित कृतिक्रम दर्शवणारा पर्याय निवडा.
माहिती : कृतिहीनतेमुळे गुंतागुंतीच्या चयापचय बदलांचा ओघ निर्माण होतो. न वापरलेल्या स्नायूंचा अपक्षय होतो, ते सहनशील रहात नाहीत त्यांची चरबीचे ज्वलन घडवण्याची क्षमता संपून ते आखडायला लागतात आणि मोठ्याप्रमाणात ग्लुकोजवर अवलंबून राहू लागतात. कृतिहीन स्नायूच्या पेशींतील मायटोकॉड्रिया म्हणजे चरबीचे ज्वलन करणाऱ्या उर्जा थैल्या नाहीशा होऊ लागतात. हे स्नायू ते जे काही जरासे काम करतात त्यासाठी ते कार्बोहायड्रेटसवर अवलंबून राहू लागतात, परिणामी न जळलेले लिपिड जमा होऊ लागतात व रक्त खूप चरबीयुक्त होते.
कृतिक्रम
अ) लोकांनी जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असणारे अन्न खाणे थांबवायला हवे.
ब) लोकांनी रक्तातील चरबीचा साठा कमी व्हावा, यासाठी चरबीयुक्त अन्नघटक खाणे टाळायला हवे.
क) लोकांनी सुदृढ रहाण्यासाठी शरीराच्या सर्व स्नायूंना समाविष्ट करणाऱ्या कृती केल्या पाहिजेत.
पर्यायी उत्तरे :

14 / 20

पुढे माहिती घटकांचा संच दिला असून त्यापुढे कार्यवाही सुचवल्या आहेत. त्यासंबंधातील सर्वात उचित पर्याय निवडा.
* शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही नेहमीचीच बाब झाली आहे.
* बदलत्या हवामानामुळे त्यासंबंधीच्या सर्व अटकळी विचित्र होत आहेत, त्यामुळे शेती करणे जिकीरीचे झाले आहे.
* माध्यमे ग्राहकांची बाजू घेऊन वाढत्या किमतींचा बागुलबोवा उभा करण्यात आघाडीवर असतात.
* अचूक निदानावर बेतलेली दूर संवेदक शेती, पोषण शेती, सुरक्षित अन्न निर्माण करणारी शेती, वायरलेस शेती, जलवायू चलाख शेती, बदलता खत वापर शेती, वात आलेखन, उत्पादन आलेखन, जल गुणवत्ता आलेखन शेती, इत्यादी अनेक नवीन कृषि पद्धति व्यवहारात येत आहेत, परंतु यासंबंधी शेतकरी सजग नाहीत.
कृतिक्रम :
अ) नव्या कृषिपद्धतींचा वापर करून सुरक्षित अन्नाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी बुद्धिमान, तंत्रकुशल, कामसू व प्रामाणिक कृषि साहाय्यकांची फळी शासन, स्वयंसेवी संस्था व कृषि विद्यापीठे यांनी सहभागाने सज्ज केली पाहिजे.
ब) शेतकरी, स्वयंसेवी गट व ग्राहक यांनी पुढाकाराने व सहभागाने गुणवत्तापूर्ण उत्पादनाचे रास्त किंमत मिळण्याच्या दृष्टीने वितरण केले पाहिजे आणि याबरोबरीने शासनानेहवा, जल, माती यांचे स्रोत, विविध परिस्थितिकी यांची गुणवत्ता टिकवणारी धोरणे आखून त्यांची हानी टाळली पाहिजे.
क) शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी, झटणाऱ्या राजकीय पक्षांना शासनाने सढळ हाताने साथ दिली पाहिजे, कारण त्यामुळे ते स्वतःची प्रगती साधू शकतील.

15 / 20

पुढे दिलेल्या पर्यायातून प्रतिपादन (A) व त्याचे कारण (R) यांच्या संदर्भात योग्य निवड करा.
प्रतिपादन (A) : सरकार चालवित असलेल्या शाळातून 6 ते 15 वयोगटातील सर्व विद्यार्थ्याना मोफत प्राथमिक शिक्षण दिले जात असले तरीही अल्पसंख्य पालक आपल्या मुलांना या शाळांत दाखल करण्यासाठी इच्छुक असतात.
कारण (R) : ज्या ठिकाणी सरकारी शाळा आहेत त्याच भागात सरकार दबाव आणणाऱ्या व्यवस्थापनांना खाजगी शाळा सुरू करण्याची परवानगी देते व बहुसंख्य पालकांना वाटते की खाजगी शाळा चांगले शिक्षण देतात व म्हणून ते आपल्या मुलांना खाजगी शाळेत दाखल करतात.
पर्यायी उत्तरे :

16 / 20

वाघळांची पूर्वीपासून प्रचलित असलेली भीतिदायक प्राणी अशी प्रतिमा बदलण्यासाठी एका देशातील संवर्धनशील गट प्रयत्नशील आहे. केवळ लाजाळू निशाचर प्राणी असल्यामुळे त्यांची भीती वाटते व त्यांना दोषी ठरवले जाते असे गटाचे म्हणणे आहे.
सत्य असल्यास, पुढे दिलेल्यातील गटाच्या या धारणेच्या अचुकतेवर सर्वात गंभीर शंका घेणारे विधान निवडा.

17 / 20

खालील प्रश्नात एक विधान आणि त्या अनुषंगाने येणारी दोन कारणे RI आणि RII दिलेली आहे. विधानासंदर्भात कारणांचे उपयोजन करून उत्तर शोधा.
विधान : हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणावर दूरस्थ खरेदी (teleshopping) करतात.
कारणे :
RI - लोक मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात.
RII-हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही.

18 / 20

खालील प्रश्नात । आणि ॥ ह्या दोन घटना दिलेल्या आहेत. दोन्ही घटना काळजीपूर्वक वाचून त्यांच्यातील संबंधांचे स्वरूप ठरवा. । व ।। मध्ये दिलेली माहिती सत्य आहे असे गृहीत धरून अचूक उत्तर निश्चित करा.
घटना:
I) श्री हरी आगीत मारले गेले.
II) कंपनीमध्ये आग लागली.
पर्यायी उत्तरे :

19 / 20

खेळाडूंसाठी बंदी घालण्यात आलेल्या पदार्थांच्या यादीत पालकात सापडणारे एक्डायस्टेरॉन हे संजीवक समाविष्ट करण्याची शिफारस बर्लिन इंस्टिट्युट ऑफ फार्मसीच्या वैज्ञानिकांनी केली आहे. त्यांच्या, 'खेळाडूंच्या प्रदर्शनात वाढ होईल' या भाकिताच्या चाचणीसाठी त्यांनी अभ्यास केला. 'ज्या सहभागींना एक्डायस्टेरॉनची मात्रा दिली त्यांच्या स्नायूंचे वस्तुमान लक्षणीय उच्च प्रमाणात वाढल्याचे, असे त्यांना या अभ्यासात आढळले.
स्वतःच्या लाडक्या ऑलिव्हसाठी दुष्ट लोकांना बडवण्यापूर्वी पोपये पालकचा हवाबंद डबा फोडून उघडत होता तेव्हा त्याचे वागणे नक्कीच सरळ नव्हते. आणि आता हे व्यंगचारित्र्य कदाचित स्वतःचे अतिमानवी सामर्थ्य "उत्तेजकाचा" वापर करून मिळवीत होते असे आता जर्मनीचे वैज्ञानिक म्हणतात.
वरील माहितीच्या आधारे खेळाडूंसाठी एक्डायस्टेरॉनचा वापर करण्यावर बंदी आणण्याची शिफारस करण्याचे सर्वात उचित कारण निवडा.

20 / 20

उपनिषदांत एक अर्थगर्भ नीतिकथा आहे. एकदा विरोचन, असुगंचा अधिपती आणि इंद्र, सुरांचा स्वामी, दोघे मिळून ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्याला ईश्वराबद्दल विचारले. त्याने या दोघांना आरशात पाहण्यास सांगितले. स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहताना विरोचनाने तत्काळ स्वतःच ईश्वर असल्याचा निष्कर्ष काढला इंद्राने स्व-प्रतिमा निरखत सखोल विचार केला तेव्हा त्याला सर्व भोवताल ईश्वर असल्याचे वास्तव उमगले. काही व्यक्ती स्वतःच्या विकासाचे मोजमाप स्वतः कडून उपभोगल्या जाणाऱ्या रकमेने आणि भौतिक सुविधांनी करतात तर काही व्यक्ती स्वतःची पात्रता स्वतः केलेल्या उत्थान आणि दैवीकरणाच्या सर्व कृतींच्या आधारे करतात. अहंकारी, स्वतः च्या स्वार्थात गुंतलेले, शोषण करताना न डगमगणारे अस्तित्व आणि भोवतालाच्या संदर्भात सर्वोच्च असे सर्जनशील व मनमोकळे अस्तित्व यातला फरक लहानसहान नाही. कथेची मध्यवर्ती कल्पना दर्शवणारा सर्वात उचित पर्याय निवडा.

Your score is

The average score is 23%

Share This Quiz to Your Friends

Facebook
0%

🎁 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️ 🆕 WWW.MpscTest.com ⚡️ इतर सर्व टेस्ट सोडवण्यासाठी खालील Link वर क्लिक करा. ⤵️

मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/marathi-grammar-practice-questions

बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/reasoning-practice-questions

सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/science-practice-questions

अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

https://mpsctest.com/math-practice-questions

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न | English Grammar Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/english-grammar-practice-questions
✅ आपल्या मित्रांना नक्की share करा. तुम्हाला कोणतीही अडचणी आली तर आपल्या खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वरती तुम्ही मेसेज करा. Chat Link – https://wa.me/+918181011002 जर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ग्रुपला क्लिक करा आणि जॉईन करून घ्या म्हणजे भविष्यात तुम्हाला सर्व अभ्यासपूर्ण माहिती तुमच्या स्वतःच्या व्हाट्सअप ग्रुप वर मिळेल. Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/F2inms6vpvUCZlkztMBbB2?mode=wwt ————————————————————————————————————————————————————————————- Police Bharti Online Form | Application Link – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php Police Bharti Advertisment 2025 – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php Police Bharti Question Paper 2025 – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php

Related Post

Leave a Comment