महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC स्पर्धा परीक्षेचा अभ्यास लाखो विद्यार्थी करीत असतात. प्रत्येक विद्यार्थ्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न असते. त्यामुळे विद्यार्थी देखील रात्रंदिवस अभ्यास करत असतात. दरम्यान, यंदा MPSC द्वारे होणाऱ्या लिपीक-टंकलेखक भरती करण्याचा निर्णय झाला आहे.
त्यानुसार राज्य शासकीय कार्यालयातील गट-क मधील लिपिकवर्गीय संवर्गातील सर्व पदे यापूढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार आहे. याबाबत निर्णय घेण्यात आलेला असल्याने संदर्भाधीन क्र. ३ ते ५ येथील शासन निर्णयातील तरतूदी व सूचना विचारांत घेवून विहित नमुन्यातील सविस्तर मागणीपत्र शासनास सादर करण्याबाबत आपणांस संदर्भाधीन क्र. २ येथील शासन पत्रान्वये यापूर्वी कळविण्यात आले आहे.
दि.१.१.२०२३ ते दि. ३१.१२.२०२३ या कालावधीत नियोजित स्पर्धा परीक्षांचा अंदाजित कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निश्चित करण्यात आला असून, स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाने उपलब्ध करुन दिले आहे (प्रत सोबत).
त्यानुसार लिपिक-टंकलेखक संवर्गातील पदे “महाराष्ट्र राजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३” मधून भरावयाचे प्रस्तावित असून, त्याकरीता जाहिरात जानेवारी, २०२३ च्या पहिल्या आठवड्यात प्रसिध्द होणार असल्याने त्यासंबंधातील पदांचे मागणीपत्र पाठवितांना सद्या रिक्त असलेली पदे व नजिकच्या काळात पदोन्नती / सेवानिवृत्ती इत्यादी बाबींमूळे रिक्त होणारी पदे विचारांत घेण्याचे आयोगाने कळविले आहे.