विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये 10वी +ITI पाससाठी मोठी भरती

विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये मोठी भरती होणार आहे. ‘अप्रेंटिस’ पदासाठी ही भरती होणार असून यासाठी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने 02 जानेवारी 2023 या तारखेपर्यंत करावा.

Total: 275 जागा

रिक्त पदांचा तपशील
1) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 36
2) फिटर 33
3) शीट मेटल वर्कर 35
4) कारपेंटर 27
5) मेकॅनिक (डिझेल) 23
6) पाईप फिटर 23
7) इलेक्ट्रिशियन 21
8) R & AC मेकॅनिक 15
9) वेल्डर (G &E) 15
10) मशिनिस्ट 12
11) पेंटर (जनरल) 12
12) इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 10
13) MMTM 10
14) फाउंड्री मन 05

शैक्षणिक पात्रता: उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा. यासह, उमेदवाराकडे 65% गुणांसह ITI NCVT/SCVT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

अर्ज फी:
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

वयोमर्यादा:
उमेदवाराचा जन्म 02/05/2009 पूर्वी झालेला नसावा. नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम ट्रेड अप्रेंटिस भरती नियमांनुसार वयात अतिरिक्त सूट दिली जाते. उमेदवारांना अधिकृत सूचना तपासण्याचा सल्ला दिला जातो.

निवड अशी होईल
भारतीय नौदल अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की या पदांसाठी निवड लेखी परीक्षेतील कामगिरीच्या आधारे केली जाईल.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जानेवारी 2023

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

About The Author

Scroll to Top