MPSC Group-C Services Recruitment 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या भरतीअंतर्गत लिपिक-टंकलेखक, कर सहायक, तांत्रिक सहायक आणि उद्योग निरीक्षक अशा विविध पदांवर एकूण 938 जागा भरण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 7 ऑक्टोबर 2025 (दुपारी 1 वाजता)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑक्टोबर 2025 (रात्री 11:59 पर्यंत)
रिक्त पदांचे तपशील
पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|
उद्योग निरीक्षक | 09 |
तांत्रिक सहायक | 04 |
कर सहायक | 73 |
लिपिक-टंकलेखक | 852 |
एकूण | 938 |
शैक्षणिक पात्रता
उद्योग निरीक्षक वगळता इतर सर्व पदांसाठी: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा शासनमान्य समतुल्य पात्रता आवश्यक.
उद्योग निरीक्षक पदासाठी:
अभियांत्रिकी (स्थापत्य शाखा वगळता) किंवा तंत्रज्ञानातील पदविका/पदवी,
अथवा विज्ञान शाखेतील पदवी आवश्यक.
पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही पूर्व परीक्षेसाठी अर्ज करता येईल (मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरल्यास पदवी प्राप्त असणे आवश्यक).
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
टंकलेखन अर्हता
कर सहायक:
मराठी: किमान 30 शब्द प्रति मिनिट
इंग्रजी: किमान 40 शब्द प्रति मिनिट
शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
लिपिक-टंकलेखक:
मराठी (30 शब्द/मिनिट) किंवा इंग्रजी (40 शब्द/मिनिट)
शासनमान्य किंवा समकक्ष प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
वयोमर्यादा (१ फेब्रुवारी २०२६ रोजी)
सामान्य प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय: 18 ते 43 वर्षे
(शासकीय नियमांनुसार सवलत लागू)
परीक्षा शुल्क
अमागास उमेदवार: ₹394/-
मागासवर्गीय उमेदवार: ₹294/-
पगार श्रेणी (Pay Scale)
पदाचे नाव | वेतनश्रेणी (₹) |
---|---|
उद्योग निरीक्षक | ₹35,400 – ₹1,12,400 |
तांत्रिक सहायक | ₹29,200 – ₹92,300 |
कर सहायक | ₹25,500 – ₹81,100 |
लिपिक-टंकलेखक | ₹19,900 – ₹63,200 |
(सर्व पदांसाठी महागाई भत्ता व इतर भत्ते नियमाप्रमाणे लागू राहतील.)
महत्त्वाचे दुवे : MPSC Group-C Services Recruitment 2025
अधिकृत संकेतस्थळ : | mpsc.gov.in |
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |
स्पर्धा परीक्षा तयारीसाठी टिप्स
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे
चालू घडामोडींवर (Current Affairs) लक्ष ठेवणे
सामान्य ज्ञान, बुद्धिमापन, आणि मराठी-इंग्रजी विषयांवर सराव करणे
वेळेचे नियोजन करून मॉक टेस्ट देणे