MPSC च्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होईल, असा निर्णय महाराष्ट्र सरकार च्यावतीने घेण्यात आला आहे. मुंबईत आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा हा निर्णय आहे. MPSC चा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होईल
राज्यात यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससी परीक्षा घेण्याचा नवा पॅटर्न 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या दरम्यान भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले होते. त्यावर आज कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं होतं. मात्र जोपर्यंत कॅबिनेटमध्ये ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत विद्यार्थी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. राष्ट्रीवादीचे आमदार रोहित पवार यांनीही यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेत हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची मागणी केली होती.
एममपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होईल, असा निर्णय महाराष्ट्र सरकारच्यावतीने घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. थोड्यात वेळात याबाबत अधिकृत घोषणा होईल. आता सरकारच्या अधिकृत घोषणेनंतर पुण्यातील विद्यार्थी हे आंदोलन मागे घेण्याची शक्यता आहे. MPSC चा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होईल