Maharashtra Saral Seva Bharti 2025

महाराष्ट्र सरकारची 75,000+ पदांची सरळसेवा मेगाभरती!

Maharashtra Saral Seva Bharti 2025 : महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या तयारीत असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी! Maharashtra Government अंतर्गत 75,000+ पदांची भरती होणार आहे. ही भरती नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका, आरोग्य विभाग, पोलिस विभाग यांसारख्या विविध शासकीय विभागांमध्ये राबवली जाणार आहे.

मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर सरळ सेवा पद्धतीने मेगाभरती होणार आहे. Maharashtra Saral Seva Bharti 2025 अंतर्गत गट-क आणि गट-ड संवर्गातील तब्बल 75,000 पेक्षा जास्त पदे भरली जाणार आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि इतर शासकीय विभागांमध्ये ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

या भरतीमुळे अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या पदांमुळे निर्माण झालेली प्रशासकीय अडथळा दूर होणार असून, युवकांना सरकारी सेवेत सहभागी होण्याची उत्तम संधी मिळणार आहे.

प्रकार माहिती
भरतीचे नाव महाराष्ट्र सरळ सेवा भरती 2025
भरती करणारी संस्था महाराष्ट्र शासन – सामान्य प्रशासन विभाग
पदसंख्या 75,000+ पदे
संवर्ग गट-क आणि गट-ड
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
भरती पद्धत CBT परीक्षा, गुणवत्ता यादी, कागदपत्र पडताळणी
परीक्षा संस्था TCS / IBPS

खाली दिलेल्या प्रमाणे विविध शासकीय विभागांमध्ये गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये एकूण तब्बल 75,000 पदे विविध क्षेत्रांमध्ये भरण्यात येणार आहेत.

क्रमांक विभागाचे नाव गट
1 नगरपरिषद / नगरपंचायत गट-क, गट-ड
2 जिल्हा परिषद गट-क, गट-ड
3 महानगरपालिका गट-क, गट-ड
4 आरोग्य विभाग गट-क, गट-ड
5 पोलिस विभाग गट-क, गट-ड
6 वन विभाग गट-क, गट-ड
7 अर्थ / सांख्यिकी गट-क
8 कृषी विभाग गट-क
9 लेखाकोषागार विभाग गट-क
10 सार्वजनिक बांधकाम (PWD) गट-क, गट-ड
11 जलसंपदा विभाग गट-क, गट-ड
12 MPCB / प्रदूषण विभाग गट-क
13 महाबीज / वखार महामंडळ गट-क, गट-ड
14 सामाजिक न्याय विभाग गट-क, गट-ड

महाराष्ट्र सरळ सेवा भरती अंतर्गत विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेग वेगळी असणार आहे. ही भरती 10वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधीअसून खाली दिलेली माहिती खालील स्वरूपात असेल पण प्रत्येक विभागाच्या अधिकृत जाहिरातीनुसार अचूक पात्रता जाहीर होईल.

शैक्षणिक पात्रता

पदाचा प्रकार पात्रता
गट-ड पदे 10वी उत्तीर्ण / ITI
गट-क पदे 12वी / पदवीधर
वनसेवक / वनरक्षक 12वी (Science)
पोलीस शिपाई 12वी + शारीरिक चाचणी
कृषी सेवक कृषी डिप्लोमा / पदवी
आरोग्य पदे वैद्यकीय / परिचारिका डिप्लोमा
MPCB / अभियांत्रिकी विज्ञान / अभियांत्रिकी पदवी

Note: उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळ/विद्यापीठातून संबंधित पात्रता पूर्ण केलेली असावी. काही पदांसाठी अनुभव, संगणक ज्ञान किंवा टायपिंग पात्रता अनिवार्य असू शकते – याबाबत सविस्तर माहिती पुढील अधिकृत PDF जाहिरातीत दिली जाईल.

वयोमर्यादा (Age Limit)

महाराष्ट्र सरळ सेवा भरती साठी उमेदवारांची वयोमर्यादा ही खालीलप्रमाणे ठरवण्यात आली आहे. ही मर्यादा सामान्य प्रशासन विभागाच्या नियमांनुसार लागू होणार असून आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत नियमाप्रमाणे सवलत दिली जाणार आहे.

प्रवर्ग किमान वय कमाल वय सवलत
सामान्य 18 वर्षे 38 वर्षे नाही
इमाआ / ओबीसी / भटका 18 वर्षे 43 वर्षे 5 वर्षे
SC/ST 18 वर्षे 43 वर्षे 5 वर्षे
दिव्यांग 18 वर्षे 45 वर्षे 7 वर्षे
माजी सैनिक 18 वर्षे 55 वर्षे सेवेप्रमाणे
महिला 18 वर्षे 43 वर्षे लागू असेल तेवढी
  • वयोमर्यादासाठी कट-ऑफ तारीख ही अधिकृत जाहिरातीत स्पष्ट करण्यात येईल.
  • उमेदवारांनी जन्मतारीख आणि आवश्यक दस्तऐवज भरती वेळी आवश्यक असेल.

महाराष्ट्राची पारदर्शक भरती मोहीम असून ह्यात संपूर्ण निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे

  1. CBT परीक्षा (Computer-Based Test)
  2. गुणवत्ता यादी (Merit List)
  3. कागदपत्र पडताळणी (Document Verification)

परीक्षा पद्धत (Exam Pattern):

विषय प्रश्न गुण
सामान्य ज्ञान 25 50
बुद्धिमत्ता / लॉजिकल 25 50
मराठी / इंग्रजी 25 50
तांत्रिक / विषयानुसार 25 50
एकूण 100 200
  • कालावधी: 90 ते 120 मिनिटे विविध पदावर अवलंबून असेल.
  • नेगेटिव्ह मार्किंग शक्यता आहे परंतु अद्याप महाराष्ट्र सरकाने ह्यामध्ये काहीही बदल केलेले नाहीत
  • परीक्षा TCS किंवा IBPS सारख्या मान्यताप्राप्त एजन्सीकडून घेतली जाईल.

जिल्हास्तरीय नियोजन Maharashtra Saral Seva Bharti 2025

सरळ सेवा भरतीचे सर्व नियोजन जिल्हास्तरावर समन्वय समित्यांद्वारे होणार आहे. यामध्ये परीक्षा केंद्र निवड, सुरक्षेची जबाबदारी, शासनास अहवाल सादर होणार आहे. यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होईल.

टप्पा तारीख
अर्ज प्रक्रिया लवकरच कळवण्यात येईल
CBT परीक्षा जुलै-सप्टेंबर 2025
कागदपत्र पडताळणी ऑक्टोबर 2025
अंतिम निकाल ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025
घटक लिंक/माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइट इथे क्लिक करा
भरतीची शॉर्ट जाहिरात Click Here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top