सेंट्रल GST आणि कस्टम्स, पुणे झोन येथे विविध रिक्त पदे भरली जाणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तर हा अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे. दरम्यान, अंतिम मुदती नंतर आलेलं कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
कोणत्या आणि किती पदांची होणार भरती
या भरती अंतर्गत “कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, हवालदार” या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे.
कर सहाय्यक – मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी किंवा समकक्ष. कॉम्प्युटरचे ज्ञान असावे. प्रति तास 8000 की डिप्रेशन्सपेक्षा असा डेटा एंट्रीचा वेग
स्टेनोग्राफर ग्रेड-II – मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष. कौशल्य चाचणी नियम श्रुतलेखन 10 मिनिटे @ गती 80 शब्द प्रति मिनिट प्रतिलेखन 50 मिनिटे (इंग्रजी)
हवालदार – कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा समकक्ष.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सह आयुक्त, (CCC). मुख्य आयुक्त कार्यालय, केंद्रीय जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन, GST भवन, वाशिया कॉलेजसमोर, ४१/ए. ससून रोड, पुणे ४११००१ हा आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2023 ही आहे. दरम्यान, या भरतीबाबत कोणतीही माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट – http://punecgstcus.gov.in ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी.
वेतन
कर सहाय्यक रु.25,000 – 81,100/-
स्टेनोग्राफर ग्रेड-II रु.25,000 – 81,100/-
हवालदार रु.18,000 – 56,900/-