---Advertisement---

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 ची गुणवत्ता यादी जाहीर ; सांगलीचा प्रमोद चौगुले पहिला

July 18, 2025 8:21 PM
nmk 2025 bharti maharashtra
---Advertisement---

मुंबई: राज्यसेवा 2021 सालची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली असून सांगलीचा प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला आला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर शुभम पाटीलने बाजी मारली आहे. तर मुलींमध्ये सोनाली म्हात्रे हिने पहिला क्रमांक पटकवला असून एकूणात ती राज्यात तिसरी आली आहे. प्रमोद चौगुले हा सध्या उद्योग आणि उपसंचालक या पदावर नाशिक येथे कार्यरत आहे. गेल्या वर्षीही तो राज्यात पाहिला आला होता. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 गुणवत्ता यादी

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच संवर्गाचे पसंतीक्रम (Preference Number) सादर करण्याकरीता 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या काळात उमेदवारांनी आपला पसंतीक्रम सादर करावा असं आवाहन एमपीएससीने केलं आहे.

या परीक्षेची सदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची आहे. अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे किंवा कागदपत्रे पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो आणि पर्यायाने उमेदवाराचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो, काही उमेदवार अपात्र ठरू शकतात असं एमपीएससीने स्पष्ट केलं आहे.

उमेदवारांकडून विहित पध्दतीने प्राप्त पसंतीक्रमाच्या आधारे अंतिम निकाल पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 गुणवत्ता यादी

1- वेबलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व 20 संवर्गाकरीता 1 ते 20 मधील पसंतीक्रम अथवा No Preference’ विकल्प निवडणे अनिवार्य आहे.
2- अधिसूचित सर्व संवर्गाकरिता 1 ते 20 मधील पसंतीक्रम निवडणाऱ्या उमेदवारांचा त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार निवडीकरीता विचार होईल.
3- अधिसूचित 20 संवर्गापैकी / पदांपैकी ज्या पदांवरील निवडीकरिता इच्छुक आहे; केवळ त्याच पदाकरिता पसंतीक्रम सादर करावेत. ज्या पदांवरील निवडीकरिता इच्छुक नाही. त्या पदांकरीता ‘No Preference’ हा विकल्प
निवडावा.
4- संवर्गाचे पसंतीक्रम सादर केल्यानंतर ‘Download PDF’ हा पर्याय निवडून उमेदवारास सादर केलेले पसंतीक्रम जतन करून ठेवता येऊ शकतील.
5- पसंतीक्रम सादर करणारे उमेदवार ज्या संवर्ग / पदांकरीता पसंतीक्रम सादर करतील केवळ त्याच संवर्ग/पदांवरील निवडीकरीता त्यांचा विचार करण्यात येईल.
6- विहित कालावधीनंतर संवर्ग/ पदांचे पसंतीक्रम सादर करण्याची अथवा बदलण्याची उमेदवाराची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment