भारताचे बाह्य कर्ज – $७३६.३ अब्ज (मार्च २०२५) : भारताचे बाह्य कर्ज विक्रमी वाढीसह $७३६.३ अब्जांवर (मार्च २०२५)
एकूण बाह्य कर्ज:
मार्च २०२५ अखेरीस भारताचे बाह्य कर्ज $७३६.३ अब्ज झाले.
हे मागील वर्षाच्या ($६६८.८ अब्ज) तुलनेत १०% पेक्षा जास्त वाढ आहे – गेल्या ७ वर्षांतील सर्वात जलद वाढ.कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तर (Debt-to-GDP Ratio):
मार्च २०२४ : १८.५%
मार्च २०२५ : १९.१%
सरकारच्या मते ही वाढ “माफक” पातळीवर आहे.
दीर्घकालीन विरुद्ध अल्पकालीन कर्ज:
दीर्घकालीन कर्ज : ८१.७%
अल्पकालीन कर्ज : १८.३%
यात ९६.८% हिस्सा आयातीसाठी लागणाऱ्या Trade Credits चा आहे.
मुख्य कर्जदार गट:
बिगर-वित्तीय कंपन्या : $२६१.७ अब्ज (सर्वात मोठ्या कर्जदार)
व्यावसायिक कर्जदार : ३९.६% हिस्सा
एनआरआय ठेवीदार : २२.४% हिस्सा
कर्जाचे प्रमुख स्रोत:
कर्जे (Loans) : ३४%
चलन व ठेवी (Currency & Deposits) : २२.८%
व्यापार पत (Trade Credit) : १७.८%
कर्ज रोखे (Debt Securities) : १७.७%
चलन वितरण:
अमेरिकन डॉलर : ५४.२%
भारतीय रुपया : ३१.१%
जपानी येन : ६.२%
एसडीआर : ४.६%
युरो : ३.२%
भारताची शाश्वतता:
इतर कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांच्या (LMICs) तुलनेत भारताची बाह्य कर्ज शाश्वतता चांगली आहे.