महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस शिपाई भरती 2024-25 ला मंजुरी देण्यात आली असून राज्यात एकूण 15,000 हून अधिक पदे भरली जाणार आहेत.
या भरतीतील विशेष बाब
2022 व 2023 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेले उमेदवार एक वेळच्या विशेष सवलतीने अर्ज करू शकतील.
भरती जिल्हा स्तरावरून होणार.
OMR आधारित लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी घेतली जाणार.
पदांचा तपशील
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| पोलीस शिपाई | 10,908 |
| पोलीस शिपाई चालक | 234 |
| बॅण्डस् मॅन | 25 |
| सशस्त्री पोलीस शिपाई | 2,393 |
| कारागृह शिपाई | 554 |
| एकूण | 15,114 |
भरती प्रक्रियेचे टप्पे
अर्ज मागवणे (ऑनलाईन)
अर्जांची छाननी
शारीरिक चाचणी (Physical Test)
OMR आधारित लेखी परीक्षा
अंतिम मेरिट लिस्ट व नियुक्ती
भरतीचे महत्त्व : पोलीस शिपाई भरती 2024-25
रिक्त पदे भरल्याने कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत होईल.
पोलिसांवरील कामाचा ताण कमी होईल.
उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन होईल.