पार्श्वभूमी : नमो अॅप डिजिटल मोहीम
प्रसंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस (१७ सप्टेंबर)
कालावधी : १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ (१५ दिवस)
समाप्ती : गांधी जयंती (२ ऑक्टोबर)
प्लॅटफॉर्म : नमो अॅप
उद्देश :
नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवणे
सेवा, राष्ट्रवाद व अभिमानाची भावना प्रबळ करणे
स्वयंसेवी कार्यांमध्ये सहभाग प्रोत्साहित करणे
प्रमुख वैशिष्ट्ये / उपक्रम (नऊ परस्परसंवादी उपक्रम)
सबका साथ, सबकी सेवा – वृक्षारोपण, रक्तदान, सामुदायिक सेवा.
AI शुभकामना रील – एआय-आधारित वैयक्तिकृत वाढदिवस शुभेच्छा.
व्हर्च्युअल प्रदर्शन – मोदींच्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे.
सेल्फी विथ पीएम – पंतप्रधानांसोबत डिजिटल प्रतिमा.
तुमचा मोदी गुण शोधा – वैयक्तिक मूल्यांची मोदींच्या मूल्यांशी तुलना.
नो युअर नमो क्विझ – मोदींच्या जीवन व नेतृत्वावरील प्रश्नमंजुषा.
नमो पुस्तक संग्रह – मोदींच्या जीवन व धोरणांवरील वाचनसामग्री.
ना मो मर्चेंडाईज – थीम-आधारित वस्तू.
वर्ल्ड विश पीएम मोदी – जगभरातून शुभेच्छा पाठवण्याची सुविधा.
उद्दिष्टे
फक्त वाढदिवस साजरा करण्यापेक्षा पुढे जाऊन :
नागरिकांना राष्ट्रउभारणीच्या उपक्रमांमध्ये सामील करणे
सेवा, सामूहिक अभिमान आणि नागरिक-सरकार नात्याला बळकट करणे
Static तथ्ये (परीक्षेसाठी महत्त्वाचे): सेवा पर्व 2025 – नमो अपवरील विशेष मोहीम
अभियानाचे नाव : सेवा पर्व 2025
प्लॅटफॉर्म : नमो अॅप
कालावधी : १५ दिवस (१७ सप्टेंबर – २ ऑक्टोबर २०२५)
प्रसंग : मोदींचा वाढदिवस व गांधी जयंती
दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस (१७ सप्टेंबर) वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने नमो अॅपने “सेवा पर्व २०२५” नावाची १५ दिवसांची खास मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम १७ सप्टेंबरपासून सुरू होऊन २ ऑक्टोबरपर्यंत, म्हणजेच महात्मा गांधी जयंतीपर्यंत चालणार आहे.
या उपक्रमामागे एक वेगळाच विचार आहे – फक्त वाढदिवस साजरा करण्यापेक्षा लोकांना सेवा कार्यात सामील करून घेणे. “सेवा” आणि “राष्ट्रभक्ती” या मूल्यांना बळकटी देणे हा या डिजिटल मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
मोहीमेमध्ये नऊ परस्परसंवादी (interactive) उपक्रम ठेवले आहेत. उदाहरणार्थ, “सबका साथ, सबकी सेवा” या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना वृक्षारोपण, रक्तदान यांसारख्या सामुदायिक कार्यात सहभागी होता येईल. “AI शुभेच्छा रील” फीचरमुळे कोणालाही पंतप्रधानांना स्वतःच्या तपशीलावर आधारित एआय-जनरेटेड आवाज व स्क्रिप्टसह शुभेच्छा देणे शक्य होईल.
तसेच “व्हर्च्युअल प्रदर्शन” या फीचरमध्ये मोदींच्या जीवनप्रवासातील महत्त्वाचे टप्पे पाहायला मिळतील, तर “सेल्फी विथ पीएम”मुळे डिजिटल पद्धतीने पंतप्रधानांसोबत फोटो घेण्याचा अनुभव घेता येईल. “नो युअर नमो क्विझ”, “नमो पुस्तक संग्रह”, “नमो मर्चेंडाईज” आणि “वर्ल्ड विश पीएम मोदी” यांसारख्या इतर उपक्रमांमुळे लोकांना या मोहिमेशी अधिक जवळीक साधता येईल.
एकंदरीत ही मोहीम म्हणजे केवळ पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करण्यापुरती मर्यादित नसून, लोकांना राष्ट्रनिर्मितीच्या प्रवासात सहभागी करून घेणारा एक डिजिटल उत्सव आहे.