---Advertisement---

अल्पभूधारक शेतकऱ्याचा पोराची MPSC परीक्षेत भरारी

July 18, 2025 10:11 PM
---Advertisement---

अनेक विद्यार्थ्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न असते. यासाठी वर्षांनुवर्षे अभ्यास करुनही अनेकांना अपेक्षित ध्येय गाठता येत नाही. मात्र, वडिल बेडवर पडलेले आई शेतात राबून घराचा गाडा चालवते अशा प्रतिकुल परिस्थितीवर हर्षल गोवर्धन मुंद्रे याने मात केली आहे. हर्षलने MPSC परीक्षेत यश मिळवून Sale Tax Inspector हे पद मिळवून युवकांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

तीवसा तालुक्यात अनकवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी गोवर्धन मुंद्रे यांचा मुलगा हर्षल यांनी या परीक्षेत प्रतिकूल परिस्थितीला मात करत यश संपादित केले आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. घरी जेमतेम शेती त्यातही वडील आजारी असल्याने घरचा सर्व भार हा हर्षलची आई वंदना मुंद्रे यांच्यावर होता. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होऊन भविष्य उज्वल करण्याचे स्वप्न हर्षल पाहत होता. अमरावती शहरातील एका वाचनालयात मागील काही वर्षांपासून सातत्याने अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 2021 मध्ये घेण्यात आलेल्या गट ब मुख्य सेवा परीक्षेत अमरावती येथील हर्षल गोवर्धन मुंद्रे या विद्यार्थ्यांने आपल्या प्रतिकूल परिस्थितीत मात करत घवघवीत यश मिळवले.

आईवर होता घरचा सर्व भार

घरी जेमतेम शेती त्यातही वडील आजारी असल्याने घरचा सर्व भार हा हर्षलची आई वंदना मुंद्रे यांच्यावर होता. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होऊन भविष्य उज्वल करण्याचे स्वप्न हर्षल पाहत होता. अमरावती शहरातील एका वाचनालयात मागील काही वर्षांपासून सातत्याने अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देत आहे.

महागड्या क्लासेसला दिला फाटा

नुकताच लागलेल्या लोकसेवा आयोगाच्या परिस्थितीत हर्षल यांनी घवघवीत यश संपादन करत सेल टॅक्स इन्स्पेक्टर हे पद मिळवले आहे. स्पर्धा परीक्षा म्हटलं की महागडे क्लासेस, नोट्स इम्पोर्टेड बुक्स या बाबी आल्याच पण हर्षल मात्र त्याला अपवाद ठरला हर्षलने आतापर्यंत कुठलेही क्लास न लावता सोशल मीडिया आणि इंटरनेटचा सकारात्मक उपयोग करत आपल्या ज्ञानात भर घालत यशाचा मार्ग सुकर केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment