सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी 8 एप्रिल 2023 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
एकूण 150 रिक्त पदे
या पदांसाठी होणार भरती/
बँकेने लिपिक संवर्गातील कनिष्ठ अधिकारी या पदासाठी ही भरती काढली असून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
शैक्षणिक पात्रता :
दरम्यान, नमूद केल्यानुसार या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराची शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच बँक / एनबीएफसी / विमा कंपनी (विक्री) च्या उपकंपनीमध्ये किमान एक वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
तसेच जाहिरातीमध्ये नमुद केल्यानुसार या पदासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराची वयोमर्यादा ही 28 वर्ष इतकी असणे आवश्यक आहे. तर या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई (Mumbai) आणि पुणे हे आहे.
अर्ज कसा आणि कुठे करायचा?
या पदासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर यासाठी बँकेचे अधिकृत संकेतस्थळ http://www.saraswatbank.com ला भेट द्यावी लागेल. यानंतर या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर होम पेजवर करिअर या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा