मुंबई पोर्टने कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंटची पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. दहावी पास आणि आयटीआय झालेले विद्यार्थी या पदांसाठी अर्ज करू शकतात. त्यानुसार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते मुंबई पोर्टच्या अधिकृत वेबसाइट mumbaiport.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
एकूण पदांची संख्या- 50
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०९ जानेवारी
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. यासोबतच नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंगने जारी केलेले COPA ट्रेड सर्टिफिकेट असावे.
वयोमर्यादा : उमेदवारांची वयोमर्यादा 14 ते 18 वर्षे दरम्यान असावी.
अर्ज शुल्क : १०० रुपये
ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : ATC, भंडार भवन, तिसरा मजला, एन.व्ही. नाखवा मार्ग, माझगाव (पूर्व), मुंबई – 400010
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 जानेवारी 2023
जाहिरात पहा : PDF