कृषी विभागात 759 पदांची नवीन भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सर्व जिल्ह्यांचे अर्ज 14 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. इच्छुक अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2023 आहे.
पदसंख्या – ७५९ जागा
पदाचे नाव – कृषि पर्यवेक्षक
जिल्हानिहाय रिक्त पदे :
कृषि विभाग नागपूर भरती 2023 – 113 पदे
कृषी विभाग पुणे भरती 2023 – 112 पदे
कृषी विभाग नाशिक भरती 2023 – 96 पदे
कृषी विभाग, औरंगाबाद भरती 2023 – 69 पदे
कृषी विभाग अमरावती भरती 2023 – 109 पदे
कृषी विभाग, ठाणे भरती 2023 – 79 पदे
कृषी विभाग, कोल्हापूर भरती 2023 – 82 पदे
कृषी विभाग, लातूर भरती 2023 – 99 पदे
शैक्षणिक पात्रता – 01) महाराष्ट्र शासनाच्या कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहायक (गट-क) या पदावर दिनांक १ जानेवारी, २०२३ रोजी किमान ५ वर्षाहुन कमी नसेल इतकी नियमित सेवा केलेल्या व्यक्ती 02) स्पष्टीकरण:- ५ वर्षांची नियमित सेवेची गणना करताना खालील बाबी गृहीत धरण्यात येतील : i) नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या व्यक्तींसाठी, कृषि सेवक पदाचा तीन वर्षांचा कालावधी पुर्ण केल्यापासून, ii) पदोन्नतीने नियुक्त झालेल्या व्यक्तींसाठी, नियमित पदोन्नतीच्या पदावर हजर झालेल्या दिनांकापासून. 03). कृषि सहायक पदावर सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण असणा-या व्यक्ती. 04) शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असणा-या व्यक्ती; आणि 05) एतदर्थ मंडळाने विहित केलेल्या नियमातील तरतुदीनुसार ज्या व्यक्ती हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत किंवा त्यांनी यापूर्वीच सदर परीक्षा उत्तीर्ण केली आहे वा सदर परीक्षा देण्यापासून सूट देण्यात आलेली आहे.
अर्ज शुल्क – रु. 650/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2023
जाहिरात पहा : PDF
Online अर्ज: Apply Online [Starting: 14 जानेवारी 2023]