महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या पदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. दरम्यान, तलाठी भरतीची प्रक्रिया कधी सुरु होणार? याची उमेदवार आतुरतेने वाट पाहत आहे.
अशातच आता या भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या भरतीसाठी रजिस्ट्रेशन लवकरच सुरु होणार आहेत. तसेच तलाठी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि त्यांची यादी या लिंक वर आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे.
एकूण जागा – 4122
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे. SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येणार आहे.
इतका मिळणार पगार
विविध जिल्ह्यांतील तलाठी (Talathi)- 5,200/- ते रु. 20,200/-.रुपये प्रतिमहिना
महत्वाचे अपडेट :
तलाठी भरतीची परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.