भारतातील पशु जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकत, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी हैदराबाद येथील राष्ट्रीय प्राणी जैवतंत्रज्ञान संस्था (NIAB) मध्ये देशातील पहिली अॅनिमल स्टेम सेल बायोबँक सुरू केली. ही अत्याधुनिक प्रयोगशाळा पशुधनाचे आरोग्य सुधारण्यासाठी, पुनरुत्पादक औषध विकसित करण्यासाठी आणि कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी महत्त्वाची ठरेल. राष्ट्रीय प्राणी जैवतंत्रज्ञान संस्था (NIAB) हैदराबाद
९,३०० चौरस फूट क्षेत्रफळात आणि सुमारे ₹१.८५ कोटी खर्चून उभारलेल्या या बायोबँकेत स्टेम सेल कल्चर युनिट, ऊतक अभियांत्रिकीसाठी 3D बायोप्रिंटर, बॅक्टेरियल कल्चर लॅब, क्रायोस्टोरेज सुविधा, तसेच उच्च दर्जाची जैवसुरक्षा प्रणाली उपलब्ध आहे. भविष्यात DBT-BIRAC च्या राष्ट्रीय बायोफार्मा मिशनअंतर्गत याचा अधिक विस्तार होणार आहे.
या सोबतच, संशोधक आणि कर्मचाऱ्यांसाठी नवीन वसतिगृह आणि निवासस्थानांच्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली, ज्यासाठी जवळपास ₹१९.९८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
उद्घाटन प्रसंगी, पाच महत्त्वाची पशुवैद्यकीय तंत्रज्ञानं लाँच करण्यात आली –
ब्रुसेलोसिस जलद निदान किट – ब्रुसेला संसर्गाचे लवकर निदान.
स्तनदाह शोध तंत्रज्ञान – दुग्धजन्य गुरांमधील रोगाची अचूक ओळख.
अँटीमायक्रोबियल सेन्सिटिव्हिटी टेस्टिंग डिव्हाइस – फक्त दोन तासांत अँटीबायोटिक संवेदनशीलतेची चाचणी.
टॉक्सोप्लाज्मोसिस डिटेक्शन किट – संसर्ग शोधण्यासाठी अचूक आणि संवेदनशील पद्धत.
जपानी एन्सेफलायटीस डिटेक्शन किट – प्राणी व मानवांमध्ये मोठ्या प्रमाणावर तपासणीसाठी जलद किट.
ही सर्व तंत्रज्ञानं ‘One Health’ संकल्पनेशी सुसंगत आहेत, ज्यात मानव, प्राणी आणि पर्यावरणाचे आरोग्य एकत्रितपणे जपले जाते.