• घोषणा: संयुक्त राष्ट्र आमसभा, ठराव 54/68, 6 डिसेंबर 1999
  • समन्वयक: जागतिक अंतराळ सप्ताह संघटना (World Space Week Association), UNOOSA च्या सहकार्याने
  • उद्देश: अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण व आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन
  • 2026 थीमचा भर: पुनर्वापरयोग्य रॉकेट (Reusable Rockets), व्यावसायिक प्रक्षेपण व नवे अंतराळ स्टार्टअप्स
  • 2026 हे रॉबर्ट गोडार्ड यांच्या पहिल्या द्रव इंधन रॉकेटचे (1926) शताब्दी वर्ष आहे

4 व 10 ऑक्टोबर का?

  • 4 ऑक्टोबर 1957: स्पुतनिक-1 (सोव्हिएत रशिया), जगातील पहिला कृत्रिम उपग्रह
  • 10 ऑक्टोबर 1967: बाह्य अवकाश करार (Outer Space Treaty) लागू झाला

🇮🇳 भारत

  • IN-SPACe: खासगी अंतराळ क्षेत्राला प्रोत्साहन व परवानगी देणारी संस्था (स्थापना 2020)
  • RLV: पुनर्वापरयोग्य प्रक्षेपण यान | NGLV: पुढील पिढीचे प्रक्षेपण यान
  • महत्त्वाच्या मोहिमा: चांद्रयान, आदित्य-L1, गगनयान
  • VSSC: विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, तिरुवनंतपुरम
  • IIST: भारतीय अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञान संस्था, तिरुवनंतपुर

महत्त्वाचे अंतराळ दिन

  • 12 एप्रिल: आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन (युरी गागारिन, 1961)
  • 30 जून: आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन (तुंगुस्का घटना, 1908)
  • 20 जुलै: आंतरराष्ट्रीय चंद्र दिन (अपोलो-11, 1969)
  • 23 ऑगस्ट: राष्ट्रीय अंतराळ दिन (भारत), चांद्रयान-3 चे चंद्रावर अवतरण (2023)

MPSC/UPSC Exam Points

  • बाह्य अवकाश करार: 27 जानेवारी 1967 रोजी स्वाक्षरी; अवकाशात अण्वस्त्रांवर बंदी; कोणताही देश चंद्र किंवा खगोलीय पिंडांवर सार्वभौमत्व सांगू शकत नाही
  • ISRO: स्थापना 15 ऑगस्ट 1969; मुख्यालय बंगळूरु
  • भारताचा पहिला उपग्रह: आर्यभट (1975), सोव्हिएत रशियाच्या मदतीने प्रक्षेपित
  • मागील थीम: 2025 “Living in Space” | 2024 “Space & Climate Change”