केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने अंमलबजावणी अधिकारी (EO), लेखा अधिकारी (AO) आणि सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (APFC) या पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी अधिसूचना जारी करणे अपेक्षित आहे. मुलाखतीच्या फेरीनंतर उमेदवारांची भरती करण्यासाठी आयोग UPSC EPFO परीक्षा २०२३ आयोजित करेल.
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 25 फेब्रुवारी 2023 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मार्च 2023 असेल.
एकूण 577 रिक्त जागा भरल्या जातील. एकूण, 418 रिक्त पदे अंमलबजावणी अधिकारी (EO)/ लेखा अधिकारी (AO) या पदासाठी आहेत आणि उर्वरित 159 रिक्त पदे सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (APFC) साठी आहेत.
आवश्यक पात्रता?
या भरतीसाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.
वयाची अट :
वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, अंमलबजावणी अधिकारी (EO) / लेखा अधिकारी (AO) साठी उमेदवारांचे वय 30 वर्षे, सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (APFC) साठी 35 वर्षे ठेवण्यात आले आहे.
शुल्क : 25/- रुपये [SC/ST/PH/महिला – शुल्क नाही]
जाहिरात पहा : PDF