केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने नागरी सेवा परीक्षा (प्रिलिम्स) – 2023 ची अधिसूचना जारी केली आहे. यावर्षी, IAS, IPS सह विविध नागरी पदांवर 1105 रिक्त जागा काढण्यात आल्या आहेत. ज्या तरुणांना IAS, IPS, IRS, IFS व्हायचे आहे ते आजपासून www.upsc.gov.in किंवा www.upsconline.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची लिंक सक्रिय केली आहे.अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 फेब्रुवारी 2023 आहे. UPSC 1105 Posts Apply Online
परीक्षेचे नाव: नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 (Civil Services Pre Examination 2023)
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी.
बॅचलर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत बसलेले विद्यार्थी अर्ज भरू शकतात. अशा उमेदवारांना सिव्हिल सर्व्हिसेस (मुख्य) साठी फॉर्म भरताना बॅचलर पदवी प्राप्त केल्याचा पुरावा सादर करावा लागेल.
वयाची अट : 01 ऑगस्ट 2023 रोजी 21 वर्षे ते 32 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
निवड
यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस निवड प्रक्रियेमध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या टप्प्यांचा समावेश होतो.
अर्ज फी – रु.100. एससी, एसटी, दिव्यांग आणि महिलांसाठी कोणतेही शुल्क नाही. व्हिसा/ मास्टर/ रुपे/ क्रेडिट/ डेबिट कार्ड किंवा UPI द्वारे फी भरली जाऊ शकते.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
पूर्व परीक्षा दिनांक : 28 मे 2023 रोजी
मुख्य परीक्षा दिनांक: नंतर कळविण्यात येईल.
UPSC 1105 Posts Apply Online
जाहिरात पहा : PDF