नवी दिल्ली, ऑगस्ट 2025 – पंचायती राज मंत्रालयाने स्थानिक प्रशासन अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी एक अभिनव डिजिटल उपक्रम सुरू केला आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्री श्री. राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते राजधानी दिल्लीत “सभासार” या AI -संचालित साधनाचे लाँचिंग करण्यात आले. Sabhasaar AI Panchayat Meeting Tool
काय आहे “सभासार”?
हे एक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित साधन आहे जे ग्रामसभा व पंचायत बैठकींच्या ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंगवरून स्वयंचलितपणे बैठकांचे मिनिट्स (MoM) तयार करेल.
यात नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) तंत्रज्ञानाचा वापर करून –
संभाषणांचे लिप्यंतरण केले जाते,
महत्त्वाचे कृती मुद्दे (Action Points) ओळखले जातात,
आणि अचूक, संरचित मिनिट्स तयार केले जातात.
भाषिक समावेशकता
“सभासार” ला भाषिनी (राष्ट्रीय भाषा भाषांतर अभियान) सोबत एकत्रित केले गेले आहे.
हे साधन सध्या १३ भारतीय भाषांमध्ये कार्य करते.
त्यामुळे विविध भाषिक पार्श्वभूमीच्या ग्रामपंचायतींमध्ये पारदर्शक व प्रभावी संवाद साधता येतो.
Sabhasaar AI Panchayat Meeting Tool
समावेशकता वाढवते – ग्रामपंचायत स्तरावर भाषेची अडचण कमी होईल.
कार्यक्षमता वाढवते – बैठकीतील चर्चेचे व्यवस्थित नोंदवही आपोआप तयार होईल.
पारदर्शकता – निर्णय प्रक्रियेत जबाबदारी निश्चित करण्यास मदत होईल.
डिजिटल सशक्तीकरण – ग्रामीण प्रशासनात AI तंत्रज्ञानाचा वापर करून “स्मार्ट गव्हर्नन्स” साध्य होईल.
“सभासार” च्या मदतीने भारतात ग्रामसभा ते संसद या संपूर्ण प्रशासनिक व्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अधिक व्यापकपणे होणार आहे.