महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ (जाहिरात क्रमांक ०७७/२०२२) च्या पदसंख्येत वाढ करण्यात आलेली आहे. या भरतीच्या पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक-2 आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 28 जुलै 2022 रोजी MPSC Group C Combine Prelims Exam Notification जाहीर केले होते. यासाठी एकूण २२८ पदांकरीता दिनांक २९ जुलै, २०२२ रोजी प्रसिद्ध जाहिरातीमध्ये शासनाकडून प्राप्त मागणीपत्राचा तपशील देण्यात आला होता. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक ०४ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या पत्रान्वये कर सहायक संवर्गाकरीता अतिरिक्त ३६७ पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे.
तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ०५ डिसेंबर, २०२२ पत्राद्वारे बृहन्मुंबईतील शासनाच्या विविध कार्यालयातील लिपिक-टंकलेखक संवर्गाचे अतिरिक्त ४४२ पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे. सदर अतिरिक्त पदांचे मागणीपत्र लक्षात घेता विषयांकित महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२२ मधून भरावयाच्या संवर्गांकरीता एकूण १९३६ पदांचा सामाजिक / समांतर आरक्षणाबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे :
Post Name | Vacancy | Increased Vacancy (08 August 2022) | Increased Vacancy (15 December 2022 |
Industry Inspector (उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय) | 6 | 6 | 6 |
Excise SI (दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क) | 9 | 9 | 9 |
Technical Asst (तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय) | – | – | – |
Tax Assistant (कर सहाय्यक, गट-क) | 114 | 481 | 481 |
Clerk-Typist (Marathi) (लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क) | 89 | 89 | 599 |
Clerk-Typist (English) (लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क) | 10 | 10 | 41 |
Total | 228 | 595 | 1136 |