- 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला, नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात 11 सप्टेंबर 2026 (शुक्रवारी) द्विपक्षीय भेट झाली Modi Putin Dialogue for Peace
- “संघर्ष सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच योग्य मार्ग आहे. शांततेच्या प्रयत्नांना मदतीसाठी भारत तयार आहे,” अशी भूमिका मोदींनी पुनरुच्चारित केली
- दोन्ही नेत्यांमधील यंदाच्या वर्षातील ही दुसरी भेट आहे — यापूर्वी 31 ऑगस्टला किर्गिझस्तानमधील बिश्केक येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांची भेट झाली होती
तिरुक्कुरल भेट
- पंतप्रधान मोदींनी पुतीन यांना तमीळ साहित्यकृती **’तिरुक्कुरल’**च्या रशियन भाषेतील अनुवादाची प्रत भेट दिली
- “दोन हजातिरुक्कुरल भेटर वर्षांपूर्वी तिरुवल्लुवर यांनी तिरुक्कुरल लिहिले. यात मानवी जीवनाचा संपूर्ण आवाका समाविष्ट आहे,” असे मोदी म्हणाले
या पुस्तकाबद्दल माहिती
- लेखक — संत-कवी तिरुवल्लुवर
- भाषा — तमिळ
- अंदाजे 2,000 ते 2,500 वर्षे जुना ग्रंथ
- साहित्यप्रकार — नीतिशास्त्रीय व सुभाषितात्मक काव्यसंग्रह
- ◾️ यामध्ये एकूण 1,330 दोहे (कुरल वेण्पा या विशिष्ट तमिळ छंदात)
- 133 अध्याय, प्रत्येक अध्यायात 10 दोहे
- 3 प्रमुख विभागांत विभागणी — अरम् (सद्गुण/नीती), पोरुळ् (संपत्ती/शासन), इनबम् (प्रेम/सुख)
- सार्वत्रिक मानवी मूल्यांवर भर — कोणत्याही एका धर्माशी संबंधित नाही
संरक्षण सहकार्याचा विस्तार
- मोदी-पुतीन यांच्या चर्चेत संरक्षण सहकार्यावर विस्तृत चर्चा झाली — यामध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या आधुनिकीकरणाचे, उर्वरित S-400 प्रणालींचा पुरवठा आणि सुखोई-57 या लढाऊ विमानांच्या प्रस्तावावर दोन्ही देशांकडून विचार होत आहे, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले
- भारत-रशिया व्यापार 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलरवर नेण्याचा निर्धार दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला
- पश्चिम आशियातील (मध्य-पूर्व) संघर्ष आणि काळ्या समुद्रातील (Black Sea) संघर्षाबाबतही चर्चा झाली — या संघर्षांचा सागरी व्यापार आणि भारतीय खलाशांच्या सुरक्षिततेवर होणारा परिणाम याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली
मोदी-पुतीन स्नेह
- मोदी आणि पुतीन एकाच गाडीतून भारत मंडपमला गेले — दोन्ही नेत्यांनी भारत मंडपम येथील रशियाच्या इनोप्रोम प्रदर्शनालाही एकत्रित भेट दिली
- पुतीन यांनी मोदींना 27व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाला भेट देण्याचे निमंत्रण दिले — मोदींनी हे निमंत्रण स्वीकारले
MPSC/UPSC Exam Points
- 18वी ब्रिक्स शिखर परिषद 12-13 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्लीत होत आहे — भारताचे हे चौथे ब्रिक्स अध्यक्षपद आहे
- तिरुक्कुरलला जगातील सर्वात जुन्या नीतिशास्त्रीय ग्रंथांपैकी एक मानले जाते — याचे 40 हून अधिक भाषांत भाषांतर झाले आहे
- भारत-रशिया संबंधांतील परंपरा — पूर्वी डिसेंबर 2025 मध्ये पुतीन यांच्या भारत भेटीदरम्यान मोदींनी त्यांना रशियन भाषेतील भगवद्गीता भेट दिली होती
- ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे भारत-रशिया संयुक्त उपक्रमातून विकसित सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे