भारत आणि युरेशियन इकॉनॉमिक युनियन (EAEU) यांच्यात मुक्त व्यापार करार (FTA) करण्यासाठी वाटाघाटी सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दोन्ही बाजूंनी “संदर्भ अटी” (Terms of Reference – ToR) या करारावर स्वाक्षरी केली आहे. India EAEU FTA Negotiations
ही स्वाक्षरी मॉस्को येथे झाली असून, भारताकडून वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव अजय भादू आणि EAEU कडून मिखाईल चेरेकाएव (उपसंचालक, व्यापार धोरण विभाग) उपस्थित होते.
या कराराचे उद्दिष्ट
भारताकडून EAEU देशांना निर्यात वाढवणे
MSME क्षेत्राला नवीन बाजारपेठ मिळवून देणे
औषधनिर्माण, पायाभूत सुविधा, ऊर्जा, उत्पादन, IT सेवा, कृषी आणि वस्त्रोद्योग यांसारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक व व्यापार वाढवणे
दीर्घकालीन व्यापार सहकार्यासाठी स्थिर चौकट उभारणे
जागतिक व्यापारात भारताचा युरेशियन भागात प्रभाव वाढवणे
EAEU म्हणजे काय?
EAEU हा पाच देशांचा आर्थिक गट आहे:
आर्मेनिया
बेलारूस
कझाकस्तान
किर्गिझ प्रजासत्ताक
रशिया
या गटाची एकत्रित लोकसंख्या १८० दशलक्षाहून अधिक आहे आणि त्यांच्याकडे प्रचंड ऊर्जा साधनसंपत्ती तसेच आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर (INSTC) सारखी महत्त्वाची व्यापार मार्ग आहेत.
व्यापारातील प्रगती
2024 मध्ये भारत–EAEU व्यापार 69 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचला.
हा आकडा 2023 च्या तुलनेत 7% वाढ दर्शवतो.
FTA झाल्यानंतर औषधनिर्माण, IT सेवा, कृषी व यंत्रसामग्री यांसारख्या क्षेत्रांत हा व्यापार आणखी झपाट्याने वाढण्याची अपेक्षा आहे.
धोरणात्मक महत्त्व : India EAEU FTA Negotiations
भारत पाश्चात्य बाजारपेठांपलीकडे नवे व्यापार भागीदार शोधत आहे. अशा वेळी EAEU सोबतचे संबंध भारताला
नवीन बाजारपेठ,
ऊर्जा साधने,
आणि धोरणात्मक कनेक्टिव्हिटी मार्ग मिळवून देतील.
यामुळे भारताचा केवळ व्यापारच वाढणार नाही तर त्याचा भू-राजकीय सहभाग देखील बळकट होणार आहे. भारत आणि EAEU यांनी एकत्र येऊन असा करार करण्याची पायाभरणी केली आहे ज्यामुळे दोन्ही बाजूंचा व्यापार वाढेल, MSME ला नवे बाजार मिळतील आणि भारताला युरेशियात मजबूत स्थान मिळेल.