भारताने महासागराच्या गूढ गाभ्याचा शोध घेण्याच्या मोहिमेत एक नवा इतिहास रचला आहे. डीप ओशन मिशन अंतर्गत भारतातील दोन aquanauts नी नॉर्थ अटलांटिक महासागरात विक्रमी मानवी डाईव्ह करून दाखवला. India Deep Ocean Mission 2025
५ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेचे (NIOT) शास्त्रज्ञ डॉ. राजू रमेश यांनी ४,०२५ मीटर खोल समुद्रात डाईव्ह केला.
त्यानंतर ६ ऑगस्ट २०२५ रोजी निवृत्त नौदल कमांडर जतिंदर पाल सिंग यांनी ५,००२ मीटर खोल समुद्रात उतरत भारताचा नवा विक्रम प्रस्थापित केला.
ही मोहिम फ्रान्सच्या सहकार्याने पार पडली. फ्रेंच Nautile सबमर्सिबल च्या मदतीने हा विक्रमी डाईव्ह पार पडला. यामुळे भारतीय aquanauts ना खोल समुद्रातील कठीण परिस्थितीत थेट प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली, तसेच भारत-फ्रान्स सहकार्य सागरी तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक दृढ झाले.
समुद्रयान प्रकल्प व भविष्याची पावले
डीप ओशन मिशन अंतर्गत भारतात Matsya 6000 नावाचा मानवसदृश सबमर्सिबल विकसित होत आहे.
हा सबमर्सिबल ६,००० मीटर खोलीपर्यंत जाण्याची क्षमता ठेवतो.
याचे प्रात्यक्षिक ट्रायल्स डिसेंबर २०२७ पर्यंत होण्याची शक्यता आहे.
यातून खनिज शोध, समुद्री जैवविविधतेचा अभ्यास आणि हवामान संशोधनाला चालना मिळणार आहे.
या यशाचे महत्त्व : India Deep Ocean Mission 2025
तंत्रज्ञानात मोठी झेप – भारत स्वतःचे खोल समुद्रात जाणारे सबमर्सिबल विकसित करत आहे.
संसाधन शोधाची संधी – भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (EEZ) खनिजे, हायड्रोकार्बन्स आणि दुर्मिळ धातू शोधण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे.
जागतिक प्रतिष्ठा – अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन यांच्यासोबत आता भारतही खोल समुद्र मानवी मोहिमा घेणाऱ्या देशांच्या यादीत सामील झाला आहे.
राष्ट्रीय अभिमान – अवकाशातील मोहिमांप्रमाणेच आता महासागराच्या तळापर्यंत पोहोचण्यात भारताने आपली क्षमता सिद्ध केली आहे.
हे यश म्हणजे २०२७ मध्ये होणाऱ्या समुद्रयान मोहिमेचा पाया आहे आणि भारताच्या महासागर संशोधन क्षमतेस नवी दिशा देणारे आहे.