Gaganyaan First Uncrewed Test Flight भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम “गगनयान” आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी पुष्टी केली आहे की गगनयानची पहिली मानवरहित चाचणी उड्डाण डिसेंबर 2025 मध्ये होणार आहे.
चाचणी प्रगती
गगनयान यशस्वी होण्यासाठी आवश्यक एकूण चाचण्या : 9,000
पूर्ण झालेल्या चाचण्या : 7,700 (80%)
उर्वरित चाचण्या : 2,300 (मार्च 2026 पर्यंत पूर्ण होतील)
डिसेंबर 2025 मधील चाचणी उड्डाण
हे उड्डाण मानवरहित (Uncrewed) असेल.
यात खालील प्रणालींची चाचणी होईल:
क्रू एस्केप सिस्टम
ऑर्बिटल मॉड्यूल
लाँच डायनॅमिक्स
उद्दिष्ट: भविष्यातील मानवयुक्त उड्डाणासाठी सर्व सुरक्षा आणि तांत्रिक तयारी सिद्ध करणे.
गगनयान मिशनची मुख्य उद्दिष्टे
३ भारतीय अंतराळवीरांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (LEO) पाठवणे.
मोहिमेचा कालावधी: ७ दिवसांपर्यंत
प्रक्षेपण वाहन: मानव-रेटेड GSLV Mk III (LVM-3)
भारताची स्वदेशी मानवी अंतराळ उड्डाण क्षमता विकसित करणे.
2025 मधील इस्रोच्या इतर प्रमुख कामगिरी : Gaganyaan First Uncrewed Test Flight
GLEX-2025 परिषदेत सहभाग – भारताच्या तांत्रिक तयारीचे जागतिक प्रदर्शन.
हाय थ्रस्ट इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टम – खोल अंतराळ मोहिमांसाठी महत्त्वाची प्रगती.
अमेरिकन कम्युनिकेशन सॅटेलाइटचे प्रक्षेपण – 6,500 किलो वजनाचा उपग्रह भारतातून प्रक्षेपित होणार.
आदित्य-L1 मिशन – 13 टेराबिट्स डेटा वैज्ञानिक समुदायासोबत शेअर.
डिसेंबर 2025 मध्ये होणारे गगनयानचे पहिले उड्डाण हे भारतासाठी मानवाला अंतराळात पाठवण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.