Cotton Kisan App Launch कापूस शेतकऱ्यांच्या सोयीसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. २ सप्टेंबर २०२५ रोजी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी “कापस किसान अॅप” लाँच केले.
या अॅपमुळे कापूस शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेअंतर्गत कापूस विक्रीची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि पारदर्शक पद्धतीने करता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दलालांपासून किंवा लांबच्या रांगेत उभे राहण्याच्या त्रासातून मुक्तता मिळेल.
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रमुख सुविधा : Cotton Kisan App Launch
मोबाईलवरूनच स्वतःची नोंदणी करता येईल.
स्लॉट बुकिंग करून कापूस विक्रीसाठी आगाऊ वेळ ठरवता येईल.
विक्री झाल्यानंतर सरकारकडून होणाऱ्या पेमेंटची स्थिती रिअल-टाइममध्ये तपासता येईल.
हे अॅप अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी वापरण्यास सोपे आहे.
सरकारचे म्हणणे आहे की, या उपक्रमामुळे सर्व पात्र कापूस शेतकऱ्यांना खात्रीशीर MSP मिळेल, त्यांची विक्री त्रासमुक्त होईल आणि वेळेवर पैसे मिळतील. तसेच भारतीय कापूस महामंडळ (CCI) आणि इतर खरेदी संस्था यांच्यासाठी नोंदी व व्यवस्थापन अधिक सोपे होईल.
हे अॅप डिजिटल इंडिया व कृषी-तंत्रज्ञान या उपक्रमांना पूरक असून शेतकरी-केंद्रित डिजिटल बदलाचे उत्तम उदाहरण मानले जात आहे .