महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, सोलापूर येथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 असणार आहे.
भरले जाणारे पद : शिकाऊ उमेदवार (अप्रेन्टिस)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित पदानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री / तारतंत्री या शाखेतून दोन वर्ष कालावधीचा आय.टी.आय. उत्तीर्ण केला असणं आवश्यक आहे.
अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2023
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
जाहिरात पहा : PDF