जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात असणारे चारठाणा येथील स्वाती पाचपांडे ही पाटबंधारे विभागात असिस्टंट ऑफिसर वर्ग – २ ( CLASS-अधिकारी म्हणून संधी मिळाली. तर आता तिची राज्यसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कनिष्ठ अभियंता जलसंपदा विभाग (Irrigation Department) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. स्वाती हिला चक्क दोन विभागात नोकरी करण्याची संधी मिळाली आहे. म्हणतात ना इमानदीने कष्ट करा फळ मिळतेच त्याच उक्तीप्रमाणे स्वातीला यश मिळाले आहे.
स्वातीचे वडील (डि.जी. पाचपांडे) वडोडा येथे वनरक्षेत्रातील वनपाल या पदावर कार्यरत आहेत. स्वातीच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत असून डॉ. प्रविण पाचपांडे, तुषार पाचपांडे, नीता पाचपांडे, वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण, वनपार पी.टी. पाटील आदींनी अभिनंदन केले.