भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचे लक्ष्य ठेवून केंद्र सरकारने दोन मोठ्या समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांचे नेतृत्व राजीव गौबा (माजी कॅबिनेट सचिव व सध्या नीती आयोगाचे सदस्य) करत आहेत. विकसित भारत व्हिजन 2047
या दोन समित्यांचे मुख्य काम :
विकसित भारत ध्येये पॅनेल –
भारत 2047 पर्यंत विकसित देश कसा होईल यासाठी दीर्घकालीन योजना, धोरणे आणि कृती ठरविणे.गैर-वित्तीय नियामक सुधारणा पॅनेल –
उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील नियम अधिक सोपे व आधुनिक करून Ease of Doing Business वाढवणे.
समन्वय व पाठबळ
या समित्या थेट केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय मंत्रिमंडळासोबत काम करतील.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या देखरेखीखाली या योजना राबवल्या जातील.
राज्य पातळीवर सुधारणा करण्यासाठी कॅबिनेट सचिव टी.व्ही.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र राज्यस्तरीय समितीही स्थापन करण्यात आली आहे.
समित्यांमध्ये कोण आहेत?
या समित्यांमध्ये फक्त सरकारी अधिकारी नाहीत तर उद्योग व अर्थतज्ज्ञांचाही समावेश आहे :
विविध मंत्रालयांचे सचिव (DPIIT, MSME, पॉवर इ.)
उद्योग तज्ञ : पवन गोएंका, मनीष सभरवाल, जन्मेजय सिन्हा
मोठ्या औद्योगिक संघटनांचे (CII, FICCI, ASSOCHAM) प्रतिनिधी
यामुळे धोरण व प्रत्यक्ष बाजाराचा अनुभव एकत्र आणला जात आहे.
या उपक्रमामागची पार्श्वभूमी : विकसित भारत व्हिजन 2047
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात “पुढील पिढीतील सुधारणा” आवश्यक असल्याचे सांगितले होते. त्यानुसार हे पॅनेल स्थापन झाले असून त्यांचे उद्दिष्ट आहे :
भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पेक्षा अधिक करणे
प्रशासन कार्यक्षम बनवणे
उद्योग, नवोन्मेष व डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करणे
केंद्र-राज्य सहकार्य वाढवून धोरणे सुरळीत अंमलात आणणे
या समित्या म्हणजे भारताला आधुनिक, स्पर्धात्मक आणि विकसित राष्ट्र बनविण्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार करणारे मार्गदर्शक गट आहेत.