भारतीय नौदलाने नवीन भरतीची अधिसूचना जारी केली असून या माध्यमातून एकूण 372 जागा भरल्या जाणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 आहे.
भरले जाणारे पद –
चार्जमन II
भरतीचा तपशील –
1. इलेक्ट्रिकल ग्रुप – 42 पदे
2. वेपन ग्रुप – 59 पदे
3. इंजिनिअरिंग ग्रुप – 141 पदे
4. कंस्ट्रक्शन & मेंटेनेंस ग्रुप – 118 पदे
5. प्रोडक्शन प्लानिंग & कंट्रोल ग्रुप – 12 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा किंवा विज्ञानातील भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा गणित या विषयांपैकी एक विषय म्हणून बॅचलर पदवी घेतली असणे आवश्यक आहे.
महत्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 15 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मे 2023
वय मर्यादा – 18 ते 25 वर्षे असावे.
शुल्क : जनरल/ओबीसी उमेदवारांसाठी 278/- [SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही]
मिळणारे वेतन – रु. 35,400/- दरमहा (भारतीय नौदलाच्या नियम आणि नियमांनुसार विविध भत्ते मिळतील.)
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत.
जाहिरात पहा – PDF