बँक ऑफ इंडियाने 500 पदांची भरती जाहीर केली आहे. बँक ऑफ इंडियाने क्रेडिट अधिकारी (जीबीओ) आणि आयटी अधिकारी (एसपीएल) IT Officer (SPL) या पदांसाठी ही भरती आयोजित केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आज 11 फेब्रुवारी 2023 पासून अधिकृत वेबसाइट https://www.bankofindia.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2023 19 मार्च 2023 आहे.
रिक्त पदांचा तपशील?
क्रेडिट अधिकारी (जीबीओ) च्या 350 रिक्त जागा
350 पैकी 135 पदे अनारक्षित आहेत. 53 अनुसूचित जातींसाठी, 30 अनुसूचित जमातीसाठी, 97 ओबीसीसाठी, 35 EWS साठी राखीव आहेत.
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा – 20 ते 29 वर्षे
आयटी अधिकारी (एसपीएल) IT Officer (SPL) च्या 150 जागा रिक्त आहे
त्यापैकी 150 पैकी 63 अनारक्षित आहेत. 23 अनुसूचित जाती, 10 अनुसूचित जमाती, 41 ओबीसी, 13 ईडब्ल्यूएससाठी राखीव आहेत.
पात्रता -बी.ई./ बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन /IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ IT/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + DOEACC ‘B’ level
वयोमर्यादा – 20 ते 29 वर्षे
शुल्क : 850/- रुपये [SC/ST/PWD – 175/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
जाहिरात पहा : PDF
Online अर्ज: Apply Online