latur babasaheb ambedkar stachu

राज्यभर चर्चा – ‘स्‍टॅच्यू ऑफ नॉलेज’ने वाढविली लातूरची शान

लातूरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 70 फूट उंचीचा ‘स्‍टॅच्‍यू ऑफ नॉलेज’ पुतळा उभारण्यात आला आहे. केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री संजय बनसोडे तसेच केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले आदींच्या मुख्य उपस्थितीत येत्या 13 एप्रिलला या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

  • लातूरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 70 फूट उंचीचा ‘स्‍टॅच्‍यू ऑफ नॉलेज’ पुतळा उभारण्यात आला आहे.
  • ‘स्‍टॅच्‍यू ऑफ नॉलेज’ हा पुर्णाकृती पुतळा उभारण्याची मूळ संकल्पना खा. सुधाकर श्रृंगारे यांची होती.
  • 50 कारागीर अन् 20 दिवस अहोरात्र काम
  • याकरिता 1400 किलो स्टील, 1400 किलो पीओपी, 3570 किलो फायबर आणि 200 लिटर पेंट वापरले गेले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आंबेडकर उद्यानात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. त्यात या पुतळ्याचे अनावरण तसेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: व्यक्तित्व, वक्तृत्व तथा कृतित्व’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या भव्य पुतळ्याची निर्मिती स्टीलच्या पायावर फायबरचा वापर करून केली आहे.

लातूर विषयी अधिक माहिती.

  • लातूर जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाड्यामधील औरंगाबाद विभागातील एक जिल्हा आहे.
  • लातूर जिल्हा प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. एकूण लोकसंख्येच्या २५.४७% लोकसंख्या शहरी आहे.
  • लातुर शहराची लोकसंख्या ३,८२,९४० (२०११ नुसार) आहे.
  • लातूर हे दक्षिणेवर राज्य करणाऱ्या राष्ट्रकूटनामक राजघराण्याची राजधानी होते.
  • लातूरचे पूर्वीचे नाव लत्तलूर असे होते.
  • राष्ट्रकूटचा पहिला राजा दन्तिदुर्ग हा याच शहरात रहात होता.
  • लातूरचे दुसरे नाव “रत्नापूर” असेही सांगितले जाते.
  • लातुर समुद्र सपाटीपासुन ६३६ मिटर उंचीवर आहे.
  • लातुरला मांजरा नदीतुन पिण्याचे पाणी मिळते.
  • लातूर सरासरी वार्षिक पाऊस ७२५ मिलि (२८.५ इंच) पडतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *