भारतीय सैन्य दलामध्ये सहभागी होण्याची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय सैन्यामध्ये अग्रीपथ भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. joinindianarmy.nic.in या भारतीय सैन्यदलाच्या अधिकृत वेबसाईटवर या भरतीसंबंधित घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. या घोषणापत्रकानुसार अग्रीवीर पथकामध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करायची तारीख १६ फेब्रुवारी २०२३ असल्याचे नमूद केले आहे. तसेच १५ मार्च २०२३ ही अर्ज करायची शेवटची तारीख आहे. Join Indian Army Agniveer Recruitment
अर्ज केल्यानंतर या भरतीच्या प्रक्रियेची खरी सुरुवात होणार आहे. १७ एप्रिल २०२३ पासून अग्रीवीर भरतीसाठीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. अग्रीवीर होण्यासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया याबाबतची संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईटमध्ये देण्यात आली आहे. भरतीच्या निवड प्रक्रियेमध्ये दोन टप्पे आहेत. यातील पहिल्या टप्प्यामध्ये संगणक चाचणी केंद्रांवर ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षेचे नियोजन करण्यात येणार आहे. तर दुसरा टप्पा AROs च्या भरती रॅलीद्वारे पार पाडला जाणार आहे.
भारतीय सैन्यातील अग्रीपथ भरतीसाठी अर्ज कसा करावा? Join Indian Army Agniveer Recruitment
- इच्छुक उमेदवारांनी joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जावे आणि पात्रतेसंबंधित माहिती मिळवावी.
- अर्ज करण्यास पात्रता असल्यास वेबसाइटवरील होमपेजवर क्लिक करावे.
- होमपेजवर ‘भारतीय सैन्य अग्रीवीर भरती २०२२ करिता ऑनलाइन अर्ज करा’ (‘Apply online for Indian Army Agniveer Recruitment 2022’) असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करावे.
- लिंकवर जाऊन उमेदवारांनी स्वतःची नोंदणी करावी.
- नोंदणी केल्यानंतर यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करावा.
- पुढे आयडी-पासवर्ड वापरुन लॉन इन करावे आणि अग्नीवीर भरतीचा अर्ज भरावा.
- योग्य कागदपत्रे जोडावी. सर्वकाही नीट तपासून अर्ज दाखल करावा.
- त्यानंतर पुरावा म्हणून स्वतःकडे अर्जाची प्रिंटआउट कॉपी घ्यावी.