संघ लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय संरक्षण अँड नौदल अकॅडमी परीक्षा जाहीर झाली आहे. एकूण ३९५ जागा भरण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी १० जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत अर्ज करावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
एकूण: ३९५ जागा
रिक्त पदांचा तपशील
नॅशनल डिफेन्स अकॅडमी/ National Defence Academy
लष्कर/ Army २०८
नौदल/ Navy ४२
हवाई दल/ Air Force १२०
नौदल अकॅडमी [१०+२ कॅडेट एंट्री स्कीम] (Naval Academy (10+2 Cadet Entry Scheme) – २५
शैक्षणिक पात्रता :
लष्कर: १२ वी परीक्षा उत्तीर्ण
उर्वरित पदांकरिता: १२ वी परीक्षा उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित)
वयाची अट : जन्म ०२ जुलै २००४ ते ०१ जुलै २००७ या दरम्यान जन्मलेला असावा.
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2023 (06:00 PM)