तुम्ही देखील एमपीएससी (MPSC) परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे राज्यात लवकरच तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची पदभरती होणार आहे. राज्यात अनेक वर्षांपासून तलाठी भरती झाली नाहीये. त्यामुळे आता इच्छूकांसाठी ही मोठी संधी असणार आहे.
तलाठीच्या 3 हजार 110 पदासांठी तर मंडळ अधिकाऱ्यांची 511 पदांसाछी भरती होणार आहे. महसूल विभागाच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. राज्य शासनाने याबाबत आदेश काढला आहे.
डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारी महिन्यात या भरतीबाबत जाहिरात निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांसाठी ही गुडन्यूज आहे. तलाठी आणि मंडळ अधिकारी () या पदांसाठी जे उमेदवार इच्छूक आहेत. त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे.
तलाठी हे पद ग्रामीण भागात महत्त्वाचे असते. तलाठी ला देखील अनेक अधिकार असतात. राज्यात अनेक वर्षांपासून तलाठी भरती झाली नाहीये. त्यामुळे आता इच्छूकांसाठी ही मोठी संधी असणार आहे.