India Post Recruitment 2023 : नव्या वर्षात टपाल विभागात 98 हजार जागांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाच्या अखत्यारित भारतीय टपाल विभागाने देशभरात तयार केलेल्या विविध मंडळांच्या अंतर्गत कार्यालयांसह कार्यरत 1.5 लाखांहून अधिक मुख्य आणि सामान्य पोस्ट ऑफिसमध्ये विविध वेतन-श्रेणीच्या रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे.
पोस्ट विभागात रिक्त असलेल्या ९८ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज आणि भरती प्रक्रिया आयोजित करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पोस्टमनच्या सर्वाधिक ५९ हजार ९९ रिक्त जागा, त्यानंतर मल्टी टास्किंग स्टाफच्या (MTS) ३७ हजार ५३९ रिक्त जागा आणि नंतर मेल गार्डच्या १ हजार ४४५ रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे.
भारतीय टपाल विभागात ९८ हजारांहून अधिक पोस्टमन, मेल गार्ड आणि एमटीएसच्या भरतीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर, विभागाच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली जाईल.
डिपार्टमेंट ऑफ पोस्ट रिक्रूटमेंट २०२३च्या संधींची वाट पाहणारे उमेदवार या वेबसाइटच्या भरती विभागात सक्रिय केलेल्या लिंकवरून इंडिया पोस्ट ९८ हजार रिक्त जागा अधिसूचना PDF डाउनलोड करू शकतील.