महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या शारीरिक चाचणी परीक्षेत बदल करण्यात आले असू नेमके कोणते बदल करण्यात आले आहे ते आपण पाहुयात..
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी लेखी परीक्षेनंतर मुलाखती असतात मात्र पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुलाखती आधी शारीरिक चाचणी घेतली जाते. या पदासाठी शारीरिक तंदुरुस्ती चाचणी द्यावी लागले. मात्र आयोगाकडून या चाचणी परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून पूर्वीसारखेच करण्यात आले आहे.
आयोगाकडून बदल करण्यात आलेल्या शारीरिक चाचणी परीक्षेमध्ये ४०० मीटर धावणे आणि लांब उडीऐवजी आता३किमी चालणे व २०० मीटर धावणे तसेच गोळाफेक अशी चाचणी घेतली जाणार आहे. त्याचबरोबर शारीरिक चाचणी परीक्षेसाठी आता १०० अंक असणार आहेत. सध्या ६० गुणांची चाचणी घेतली जात होती. पोलीस उपनिरीक्षक चाचणीतील या बदलांचा फायदा महिला उमेदवारांना होणार आहे.
सध्या ६० गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेतली जाते. या चाचणीमध्ये कमी गुण मिळाल्यास उमेदवार मुलाखतीला पात्र ठरू शकत नव्हते. त्यामुळं आता शारीरिक चाचणीला जास्त महत्त्व आलं होतं. मात्र अंतिम निवडीसाठी या गुणांचा विचार केला जात नव्हता.
नव्या बदलानुसार आतापीएसआयची परीक्षा उत्तीर्ण करायची असेल तर शारीरिक चाचणी आणि मुलाखत महत्वाचा भाग असणार आहे. पूर्वपरीक्षा ही १००गुणांची असते. पीएसआय,एसटीआय या सर्व पदांसाठी ही एकच परीक्षा असते. त्यामधून फक्त मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविले जाते. हे गुण मुख्य परीक्षेमध्ये ग्राह्य धरले जात नाहीत. पण, मुख्य परीक्षा वेगवेगळी असते. यामध्ये पदांसंबंधी एक वेगळा पेपर असतो. पीएसआय पदासंबंधी माहिती त्या पेपरमध्ये विचारलेली असते. ही परीक्षा २०० गुणांची असते. त्यानंतर १०० गुणांची शारीरिक चाचणी आणि ४० गुणांची मुलाखत आहे. मुख्य परीक्षेचे २००, शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचे १४० गुण असे एकूण ३४० पैकी प्राप्त गुणांवर अंतिम निकाललागणार आहे.