सरदार वल्लभभाई पटेल यांची आज पुण्यतिथी. यानिमित्ताने देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ते देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते. त्यांना भारताचे लोहपुरुष म्हणूनही ओळखले जाते.
सरदार वल्लभभाई पटेल
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी झाला, ते भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते. ते महान स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यानंतर संस्थानांच्या एकत्रीकरणात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. हैदराबादचा भारतात समावेश करण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. ते 15 ऑगस्ट 1947 ते 15 डिसेंबर 1950 पर्यंत देशाचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान होते. 15 डिसेंबर 1950 रोजी त्यांचे निधन झाले.
राष्ट्रीय एकता आणि अखंडतेसाठी सरदार पटेल पुरस्कार
राष्ट्रीय एकात्मतेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या एकात्मतेसाठी समर्पित केले. भारताचे सध्याचे स्वरूप त्यांच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाले आहे. राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार त्यांच्या नावावर ठेवणे ही त्यांना देशाकडून आदरांजली आहे, यामुळे लोकांना भारताची एकता टिकवून ठेवण्याची प्रेरणा मिळेल.