Saturday, February 8, 2025
spot_img

12वी नापास ; नंतर UPSC मध्ये पहिल्याच प्रयत्नात मिळविले यश, वाचा अंजू शर्मांची प्रेरणादायी कहाणी

IAS अंजू शर्माने आपल्या यशाने हे सिद्ध केले आहे की, जे कठोर परिश्रम करतात त्यांचा कधीही पराभव होत नाही. काही अपयशाची भीती बाळगणे, हार मानणे किंवा मागे हटणे हे कशावरही उपाय असू शकत नाही. राजस्थानमधील रहिवासी असलेल्या आणि गुजरात केडरमध्ये तैनात असलेल्या IAS अंजू शर्मा बारावीत असताना नापास झाल्या होत्या आणि नंतर वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी यूपीएससी उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवले

बारावीत नापास –
अंजू शर्मा या इयत्ता 12वीच्या अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये नापास झाल्या होत्या. तसेच 10वीच्या रसायनशास्त्राच्या प्री-बोर्डमध्येही नापास झाल्या होत्या. मात्र, इतर विषयांत त्या डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाल्या होत्या. याबाबत अंजू शर्मा म्हणतात की, तुमच्या अपयशासाठी तुम्हाला कोणीही लक्षात ठेवत नाहीत. केवळ तुम्ही तुमच्या यशामुळे लक्षात राहतात. त्यांच्या आयुष्यातील दोन घटनांनीच त्याचे भविष्य घडवले, असा त्यांचा विश्वास आहे.

अंजू शर्मा सध्या कुठे कार्यरत –
अंजू शर्मा यांनी 1991 मध्ये राजकोटमध्ये असिस्टंट कलेक्टर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्या सध्या सरकारी शिक्षण विभाग (उच्च आणि तंत्रशिक्षण), सचिवालय, गांधीनगर येथे प्रधान सचिव आहेत. त्यांनी गांधीनगरमध्ये जिल्हाधिकारी आणि भारत सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयात विविध पदांवर काम केले आहे. यासोबतच त्यांनी NRHM मध्ये तीन दशकांहून अधिक काळ सेवा दिली आहे.

अंजू एकदा प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या होत्या की, ‘प्री-बोर्डच्या काळात त्यांना खूप चॅप्टर्स वाचायचे होते आणि जेवणानंतर मला अभ्यास करायचा होता. मग मी घाबरू लागले कारण मी काहीही तयारी केली नव्हती आणि मला माहित होते की मी नापास होणार आहे. माझ्या आजूबाजूच्या प्रत्येकाने 10 वी मधील कामगिरी किती महत्त्वाची आहे यावर भर दिला. कारण दहावीच्या गुणानंतर पुढच्या उच्च शिक्षणाचा मार्ग ठरतो.

मात्र, या कठीण काळात अंजू शर्मा यांच्या आईने त्यांना धीर दिला आणि प्रेरणा दिली. शेवटच्या क्षणाच्या अभ्यासावर अवलंबून राहू नये, हा धडाही त्यांनी शिकविला. त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच कॉलेजच्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि यानंतर त्यांनी कॉलजमध्ये सुवर्णपदकही मिळवले. त्यांनी जयपूरमधून बीएससी आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. आपल्या अभ्यासाबाबतच्या या नियोजनामुळेच अंजू शर्मा या पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि आयएएस टॉपर्सच्या यादीत सामील झाल्या. त्यांचा प्रवास हा तरुणाईला नक्कीच प्रेरणादायी आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles