करमाळा: परवा MPSC चा निकाल लागला त्यामध्ये करंजे गावातील तिघांची निवड झाली त्यामध्ये माझा लहान भाऊ अभयसिंह पाटील व दुसरी बहीण ऋतुजा सरडे या दोघांची सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) तर दुसरा पुण्यातील रूममेट व गावातील शेजारी असा संभाजी पवार याची जलसंपदा विभागात निवड झाली, यातील माझा लहान भाऊ अभय याची ही तिसरी निवड आहे तो यापूर्वी नगर अभियंता चंद्रपूर ला होता नंतर जलसंपदा विभागात सीना कोळगाव या धरणाचा कार्यभार हा त्याच्याकडे होता अन आता बांधकाम विभागात त्याची निवड झालीय हे निश्चितच माझ्यासाठी व कुटुंबासाठी सुखावणार आहे.
त्याचवेळी संभाजी पवार हे रेल्वे खात्यात होते पण आता त्यांची जलसंपदा विभागात निवड झाली आहे. त्यांचा संघर्ष मी खूप जवळून पाहिला आहे. संभाजीच्या बाबतीत मात्र ते फार वेगळे होते. त्यांचे वडील शेतकरी असल्याने प्रत्येक शेतकर्यामागे आर्थिक संकट होते आणि तेही त्यामागे होते.
हे सुद्धा वाचा: राज्यभर चर्चा – ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ने वाढविली लातूरची शान
सर्वात जास्त म्हणजे, मी ऋतुजाचे कौतुक करतो की ती कोणताही क्लास न घेता यश मिळवू शकते हे दाखविल्याबद्दल. ऋतुजाचे वडील मिनिनाथ सरडे (मिनूकाका) हे आदिनाथ सहकारी कारखान्याचे कर्मचारी आहेत. तिच्यासारख्या इतर पालकांच्या पाठिंब्याने ग्रामीण भागातील मुलींच्या पाठिंब्याने प्रत्येक मुलगी ऋतुजाप्रमाणेच यश संपादन करू शकते, हे निश्चित.
मला यामध्ये आभिमानाने सांगावं वाटत की मागील दोन वर्षात करंजे गावात 4 अधिकारी घडले त्यातील तिघे हे माझे पुण्यातील रूम मेट (Roommate) होते. त्यातील अभय संभाजी हे जलसंपदा व रेल्वे मध्ये तसेच तुषार सरडे हा सध्या नगरअभियंता म्हणून भूम येथे कार्यरत आहे, जर का चांगल्या मित्रांची संगत असेल तर आपली वाटचाल ही तशीच होते हे इथे दिसून येते. बाकी सुरवात या चौघांनी केलीय येणाऱ्या काळात इतर ही आधिकारी करंज्यात घडतील व त्यांना आपणा सर्वांचे मार्गदर्शन असेच लाभत राहील एवढीच अपेक्षा तसेच तुम्हा तिघांच खूप खूप अभिनंदन
– डॉ. विजयसिंह बाबासाहेब पाटील