तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक गुडन्यूज आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीनंतर तलाठी भरतीचीही घोषणा करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र बँकेतही भरती होणार असून राज्याच्या वन विभागातही शेकडो नोकऱ्या आहेत. तुम्हालाही सरकारी नोकरी हवी असेल तर ही बातमी चुकवू नका. एका क्लिकवर तुम्हाला राज्यभरातील संपूर्ण मेगाभरतीबद्दल माहिती मिळणार आहे. या भरतीविषयी सविस्तरपणे जाणून घेवूया…
महाराष्ट्र तलाठी भरती
महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठीपदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो (State Government Megabharti) जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.
अधिकृत वेबसाईट – https://rfd.maharashtra.gov.in/
महाराष्ट्र वन विभाग भरती
महाराष्ट्र वन विभाग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वनरक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र (State Government Megabharti) उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/
MPSC अंतर्गत 1037 जागांवर भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय, दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क, कर सहाय्यक, गट-क, लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क, लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 असणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा – https://mpsconline.gov.in/candidate