भारतीय रेल्वेमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. विशेष बाब म्हणजे 10वी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. दक्षिण मध्य रेल्वे [South Central Railway] मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या ४१०३ जागांसाठी भरती होणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी २९ जानेवारी २०२३ पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा.
एकूण पदसंख्या : ४१०३
भरण्यात येणारी पदे :
१) AC मॅकेनिक / AC Mechanic २५०
२) कारपेंटर / Carpenter १८
३) डिझेल मेकॅनिक / Diesel Mechanic ५३१
४) इलेक्ट्रिशियन / Electrician १०१९
५) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / Electronic Mechanic ९२
६) फिटर / Fitter १४६०
७) मशीनिस्ट / Mechanist ७१
८) MMTM ०५
९) MMW २४
१०) पेंटर / Painter ८०
११) वेल्डर / Welder ५५३
शैक्षणिक पात्रता: (i) 55% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट: 30 डिसेंबर 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: दक्षिण मध्य रेल्वेचे युनिट