सरकारी अधिकारी होणे.. हे बऱ्याच तरुणांची इच्छा असते. त्यासाठी काही रात्रंदिवस मेहनत घेत असतो. मात्र यातही काही जणांना यश मिळविता येतं. तर काहींच्या पदरी निराशा पडते. मात्र यातूनही खचून न जाता बरेच तरुण आपले पप्रयत्न सुरु ठेवतात. दरम्यान. प्रामाणिकपणे केलेले कष्ट यशाला गवसणी घालण्यासाठी पुरेसे असतात असं म्हंटलं जातं. याचा प्रत्यय आलाय नाशिकमध्ये.
संपूर्ण भारतातून 30 उत्तम सैनिकांमधून जे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून विविध परीक्षांचे स्तर पूर्ण करतील अशा 12 सैनिकांची पॅरा कमांडो म्हणून निवड करण्यात येणार होती, त्यामध्ये नाशिकच्या जयदीप जाधवचा सहभाग झाला आहे.
कष्टाचं चीज झालं
चांदवड तालुक्यातील वाकी खुर्दचे जयदीप जाधव हे भूमिपुत्र आहेत. भारतीय सैन्यदलातील अतिशय खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करत पॅरा कमांडो होण्याचा जयदीप यांनी बहुमान पटकावला आहे. नुकतीच देशातील भारतीय सैन्य दलातील पॅरा कमांडोची यादी तयार करण्यात आली आहे.
विविध बटालियन मधील फक्त बारा जणांची यामध्ये निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिकच्या ग्रामीण भागातील एका गवंडयाचा मुलगा मराठा बटालियनच्या माध्यमातून खडतर प्रशिक्षण पूर्ण करून पॅरा कमांडोच्या टीममध्ये सहभागी झाला आहे. पोरानं कष्टाचे चीज केल्याने आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदश्रु आले होते. जयदीप जाधव असं त्याचे नाव असून चांदवड तालुक्यातील वाकी खुर्द या गावचा तो रहिवासी आहेत. या निवडीनंतर गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार करत कौतुक केले आहे.